• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 17, 2025
in Uncategorized
0
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत

एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

शिव सेना ५९ वर्षाची झाली आहे. शिव सेनेच्या स्थापने नंतर दुसऱ्याच वर्षी उल्हासनगर शहरात मराठा विभाग या मराठी बहुल (हॊ त्याकाळी मराठी समाज अल्पसंख्यांक होता) कॅम्प नं. ४ येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेची स्थापना झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शाखा. नंतर शिवसेनेचा विस्तार उल्हासनगर मधील विभागवार शाखांनी शहरभर झाला. त्यात माझी लालचक्की विभाग शाखा ही १९७४ साली स्थापन झालेली पहिली शाखा. अश्या सुमारे चाळीस शाखा शहरभर होत्या. उल्हासनगर शिवसेनेचा सर्व कारभार रमेश मुकणे शहर प्रमुख व नंतर राजेंद्र चौधरी शहर प्रमुख असे पर्यन्त मराठा विभागाच्या याच शाखेतून चालायचा. अगदी राजेंद्र चौधरीनी शिव सेना सोडल्या नंतरही या शाखेचा मध्यवर्ती दर्जा कायम राहिला.शेखर यादव हा माजी नगरसेवक या शाखेची धुरा सांभाळत होता. मधल्या काळात या शाखेचे महत्व कमी कमी करण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले. महत्वाचे निर्णय व कारभार भलतीकडेच म्हणजे संतोषनगर येथून होऊ लागला होता.

उल्हासनगर पूर्वेचा भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला गणला जात होता. सलग तीन चार प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून येत असत. शिवसेनेस खिंडार पडून एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिह भुल्लर,राजेंद्र चौधरी, चंद्रकांत बोडारे, रमेश चव्हाण, हे हुकमी एक्के आपल्या गटात साम, दाम, दंड, भेद नितीने वळवले. काही दहशतीने गेले, तर काही वैयक्तिक स्वार्थ व आर्थिक घोटाळे दडपण्यासाठी गेले. या पडझडीत ही शेखर यादव हा ठामपणे शिवसेनेसोबत टिकून होता. परंतू आगामी निवडणुकीत त्याचा निभाव लागणार नाही, असे दिसताच तोही शिंदेच्या आश्रयास गेला. त्याच्या पाठोपाठ सुरेंद्र सावंत हा ज्येष्ठ शिव सैनिकही शिंदे चरणी लीन झाला.

इथवर सर्व ठिक होते परंतू शिवसेनेचे नाक म्हणा वा उल्हासनगर शिवसेनेचे “सेना भवन” असलेल्या मध्यवर्ती शाखेवरही शिंदे सेनेने कब्जा मिळवला. ही शाखा आपल्या ताब्यात ठेवण्यात जिल्हा प्रमुख असलेल्या धनंजय बोडारेला अपयश आले. सुरुवातीस दोन बायका फजिती ऐका अशी अवस्था या शाखेची झाली. ती दोघांनीही वापरायची अशी षंढपणाची तडजोड झाली. मात्र काही दिवसात मध्यवर्ती शाखेवरील मूळ शिव सेनेचे नामो निशाण मिटवले जात असताना स्थानिक नेते व जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे हतबलतेने हात चोळत राहिले. बघता बघता हा किल्ला गनिमांनी काबीज केला, आम्ही तो वाचवण्यासाठी लुटूपुटूचीही लढाई केली नाही. हाराकिरी पत्करून तलवार म्यानातच ठेवली.

आज उल्हासनगर शिव सेना खऱ्या अर्थाने निर्वासित झाली. उद्धव ठाकरे वा अन्य कोणी नेते आले तर या बालेकिल्ल्यात त्यांना पाय ठेवायला जागाच नाही. नाही म्हणायला जिल्हा प्रमुख बसतात ती संतोष नगरची शाखा उरली असली तरी तिथेही भाऊ बंदकी आहे. एकाच शाखेत दोन भाऊ बसतात एक शिंदे निष्ठ -चंद्रकांत बोडारे व दुसरा धनंजय बोडारे. एकाच कार्यालयात एकाच छताखाली एक उजवीकडे तर दुसरा डावीकडे टेबल खुर्ची मांडून कोणताही आडपडदा न ठेवता दोन्ही सेनांचे “कार्य” चालते. आत्ता शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या मुलाखती व मूळ शिव सेनेच्या उमेदवारांच्या मुलाखती एकाच ठिकाणी व एकाच घरातील दोन भाऊ घेणार. आहे की नाही गंम्माडी गंम्मत.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे एक आदर्श उदाहरण आहे. ज्यांनी शिव सेना संपवण्याचा विडा उचलला त्यांच्याच देखरेखी खाली मूळ शिव सेना कशी काय फोफावेल ? बांडगुळे ज्या झाडावर असतील त्याची कधीच वाढ होऊ देत नाहीत.

याचाच परिणाम शिवसेनेच्या पंचवीस नगरसेवकांपैकी अवघे दोनच नगरसेवक उरलेत. ते ही जिल्हा प्रमुख व त्यांची सौभाग्यवती. आत्ता हेच हितसंबंधिताना उमेदवारी देणार, गटबाजी करून निष्ठावंताना डावलणार! आज ७८ प्रभागातील निम्म्याहून अधिक ठिकाणी उमेदवारच नाहीत. जे आहेत ते आर्थिक दृष्ट्या कमकुवत. जे अंबरनाथ मध्ये घडले तेच उल्हासनगर मध्ये घडणार. अंबरनाथच्या दुर्घटनेपासून शिव सेना काही बोध घेणार की AB फॉर्म विकणाऱ्या, माघार घेणाऱ्या व विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्यांची वर्णी लावून हसे करून घेणार ?

Views: 46
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आदर उध्दव ठाकरेंबद्दल तरीही सोडतो शिवसेना…..तुषार राजे यांचे मनोगत !!

आदर उध्दव ठाकरेंबद्दल तरीही सोडतो शिवसेना.....तुषार राजे यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)