• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आदर उध्दव ठाकरेंबद्दल तरीही सोडतो शिवसेना…..तुषार राजे यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 18, 2025
in Uncategorized
0
आदर उध्दव ठाकरेंबद्दल तरीही सोडतो शिवसेना…..तुषार राजे यांचे मनोगत !!

आदर उध्दव ठाकरेंबद्दल तरीही सोडतो शिवसेना

तुषार राजे यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

नवी मुंबईतील एक वजनदार नगरसेवक मनोहर मढवी यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश करतांना आपण वैयक्तिक कारणासाठी प्रवेश करीत आहोत. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. तसेच ठाकरे सेनेतील कोणाबद्दलही आपली तक्रार नाही असे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर या दहिसरमधील माजी नगरसेविकेने भाजपामध्ये प्रवेश करतांना ठाकरेंची साथ सोडतांना फार यातना होतात असे सांगितले. गेल्या दोन महिन्यात ज्यांनी ज्यांनी ठाकरे सेनेतून इतर पक्षात प्रवेश केले त्यातील बहुसंख्याकांनी जवळजवळ असेच सांगितले. प्रभागातील मतदारांसाठी, निधींसाठी आपण प्रवेश करीत आहोत अशा लोणकढी थापा मारतांना आपली निष्ठा ही फक्त खूर्चीसाठी आहे हेच दाखवून दिले.

नवी मुंबईतील मनोहर मढवी शिवसेना विभाजनानंतर ठाकरेंबरोबरच राहिले. यापूर्वी गणेश नाईक यांच्याशी जवळीक असलेल्या मढवींनी ठाकरेंशी जवळीक निर्माण केली. त्यांनी ठाकरे सेना सोडली नाही म्हणून त्यांना त्रासही देण्यात आला. तडीपारीच्या नोटीसाही निघाल्या. त्यामुळे मढवी ठाकरे सेना सोडणार नाहीत अशी अटकळ बांधली जात होती. परंतु गेल्या चार महिन्यांपासून त्यांची शिंदे गटाशी सुरु असलेली अर्थ’पूर्ण चर्चा तथा वाटाघाटी सफलसंपूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने मनोहर तथा एम. के. मढवी हा गणेश नाईक यांना टक्कर देणारा मोठा मोहरा असल्याने तशीच किंमत मोजून प्रवेश सोहळा पार पडला.

येत्या काही दिवसात अनेक अनपेक्षितांचे प्रवेश अपेक्षित आहेत. तत्त्वांचे सोंग करत केवळ उमेदवारी मिळविण्यासाठी हा आटापिटा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहणार आहे. पक्ष कोणताही असो त्या त्या पक्षामध्ये इमानेइतबारे काम करणार्‍या प्रामाणिक कार्यकर्त्यांना सहजासहजी उमेदवारी नाही हे पक्के आहे.

फोडाफोडीच्या या राजकारणाचा सर्वाधिक फटका ठाकरे सेनेला बसला आहे. जे सैनिक निष्ठा मानतात, ठाकरे व मातोश्रींशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगतात. ज्यांना कोणत्याही पदाचा मोह नाही असे अनेक निष्ठावंत शेवटपर्यंत ठाकरेंसोबतच राहणार आहेत, एवढी पडझड होवूनही ठाकरे सेनेत कार्यपध्दतीत जे आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत ते मात्र होतांना दिसत नाहीत. आजही एखादा प्रामाणिक शिवसैनिक, पदाधिकारी थेट मातोश्रींपर्यंत पोहचू शकत नाही. एकनाथ शिंदे यांच्या सेनेतही अशीच स्थिती आहे. एकनाथ शिंदे यांची भेट म्हणजे शिंदे सेनेतील सैनिकाच्या दृष्टीने दिव्यच आहे. परंतु शिंदे सेना सत्तेत आहे. साम-दाम-दंडाचा अवलंब करुन पक्ष वाढवता येत आहे. ती स्थिती ठाकरे सेनेत नाही. एवढे होवूनही पदाधिकारी नेमतांना किमान जुन्या जाणत्यांना विश्वासात घेवून नेमले जात नाहीत. ज्याचा मातोश्रींवर राबता त्यांच्याच सल्ल्याने अनेक ठिकाणी पदाधिकारी नेमले जातात. त्यातून असंतोष निर्माण होतो. जो पदाधिकारी बदलायचा आहे किमान त्याला सांगून बदलला पाहिजे. कोणाला तरी आयत्या वेळीस बोलाविले जाते आणि नेमणूक होते. त्यातूनच नको ते घडते.

अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आमदार’की साठीच इच्छुक असलेले दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली. स्थानिक कार्यकर्ते तथा सैनिकांना काय वाटते ? यापेक्षा ज्यांचा त्या त्या शहराशी संबंध नसलेले संपर्कप्रमुख शिफारस करतात आणि उमेदवारी दिली जाते. डोंबिवलीत कोणालाही उमेदवारी दिली असती तरीही पराजय हा ठरलेला होता. मग ज्यांनी अनेक वर्षे किल्ले लढवले त्यांनाच का नको? सदानंद थरवळ वा दीपेश म्हात्रे कोणालाही उमेदवारी दिली तरी तेवढीच मते मिळाली असती. हे त्या शिफारसकर्त्यांना कोण सांगणार? सुभाष भोईर यांना संपर्कप्रमुख म्हणून बदलणे असो, वा नवे पदाधिकारी नेमणे असो, जुन्यांना विश्वासात घेवून निर्णय आवश्यक होते. दुर्देवाने तसे घडत नाही.

किमान पदे वाटतांना निष्ठावंतांनाच दिली गेली पाहिजेत. किमान हे पथ्य पाळले गेले पाहिजेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचे अवमुल्यंन करण्यात आले. दोन विधानसभांना एक जिल्हाप्रमुख देवून जिल्हा नेतृत्व मोडीत काढण्यात आले. जिल्ह्यात ठाम निर्णय घेणारा नेता नाही आणि सामान्य पदाधिकारी मातोश्रीपर्यंत पोहचू शकत नाही. याचाही विचार झाला पाहिजे. अनेक उपनेते नेमले परंतु त्यांंचे काम काय ? हे सांगितले नाही. त्यांनी कुठे कुठे काम करायचे याचीही स्पष्टता नाही. त्यामुळे अनेक उपनेते पदापुरतेच राहीले.. संघटनेचे जबरदस्त नुकसान होवूनही संघटनात्मक बांधणी करण्यासाठी बाहेरचे संपर्कप्रमुख देतांना त्यांच्याबरोबर एखादा स्थानिक दिला गेला पाहिजे. त्याहीपेक्षा निष्ठावंतांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे.

अजूनही ते घडत नाही. मग त्यातूनच उध्दव ठाकरे यांच्याविषयी आदर आहे, असे सांगत पक्षांतरे होतात. संघटना खरोखरच उभी करायची असेल तर प्रत्येक शहरांमध्ये असलेल्या निष्ठावंतांना विश्वासात घेवूनच निर्णय घेतले गेले पाहिजेत. परंतु हे सर्व घडेल का?

Views: 81
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
‘डोन्ट कॉल मी एक्सलेन्सी’… ‘येस एक्सलंसीं’ !! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

'डोन्ट कॉल मी एक्सलेन्सी'… 'येस एक्सलंसीं' !! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)