माळवे वस्ती जी.प.शाळेच्या संरक्षण भिंत बांधकाम शुभारंभ संपन्न
झरे ता.आटपाडी येथील माळवे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळच्या संरक्षण भिंत बांधकामाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आम्.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
शाळेच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या संरक्षण भिंतीच्या कामामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण मिळणार असून ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाले.
,यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजप नेते बंडू कातुरे, माजी उपसभापती दिलीप खिलारी, भाजप युवा मोर्चा विधानसभा प्रमुख प्रणव गुरव, माजी उपसरपंच कैलास वाघमारे, सरपंच अंकुशराव पाटील, उपसरपंच संतोष वाघमारे, माजी सरपंच अधिक माने, मदन कातुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राजमाने, सुखदेव भानुसे,काका माळवे, आबासो भानुसे , गणेश माळवे, नंदू भानुसे, पुजारवाडीचे माजी सरपंच संदिपान पुजारी, बाळू जेडगे तसेच सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


