सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे अल्पसंख्यांक दिन उत्साहात ,साहित्यिक रमेश जावीर यांचे व्याख्यान संपन्न……
आज गुरुवार दिनांक १८ डिसेंबर 2025 रोजी संस्थेचे श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे अल्पसंख्याक दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे शिक्षण तज्ञ मार्गदर्शक साहित्यिक रमेश जावीर सर यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार एस एस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जावीर यांचे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. व्याख्यानात स्वातंत्र्यपूर्व भारत व स्वातंत्र्योत्तर भारत आणि संविधान निर्मिती याबाबत सविस्तर माहिती विशद केली. संविधानाने भारतीय नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समते बरोबर हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. भारतामध्ये बंधूभाव अखंड ठेवला पाहिजे म्हणून अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करण्यात आली .
कार्यक्रमास सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळेल सरांनी केले तर विद्यालयाचे पर्यवेक्षक जाधव पिढी सरांनी रमेश जावीर सरांचे आभार व्यक्त केले.


