• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आत्ता गद्दार कुणा कुणाला म्हणू मी ? ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 19, 2025
in Uncategorized
0
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

आत्ता गद्दार कुणा कुणाला म्हणू मी ?

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

सुरुवातीस शिवसेना सोडून शिंदे सेनेत गेलेल्यांवर मीं तुटून पडत होतो. अगदी नाते संबंध व मैत्रीपूर्ण संबंधही न जुमानता मी प्रत्येकाला गद्दार म्हणून झोडपून काढत होतो. त्यात अनेक दशकातील मित्र होते, गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के पासून भुल्लर महाराज, रमेश चव्हाण, राजेंद्र चौधरी, सह अनेकां
विरोधात जहाल शब्दात लेखन केले. एकनाथ शिंदे असो की खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर कोणीही माझ्या तावडीतून सुटले नाहीत.

गेल्या काही महिन्यात “जे कधीच गद्दारी करू शकणार नाहीत असा माझा ठाम विश्वास होता ते एक एक करून पक्ष सोडू लागले.” यात निष्ठावंतांचे आयकॉन असलेले विश्वनाथ (बुवा) खटाटे गेले, त्यांचा सोबत 1966 पासून निष्ठावंत असलेले अनेक लोक गेले, कल्याण डोंबिवलीतील अनेक निष्ठावंत म्हणवणारे गेले, सदानंद थरवळ, हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव, उल्हासनगरचे बाळा श्रीखंडे, सुनील कलवा, राजू चिकणे, शेखर यादव, सुरेंद्र सावंत आणि आज शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा रसाळ ही शिंदे गटात गेल्या.त्या आधी नवी मुंबईचे एम. के. मढवी ही गेले. ही मंडळी जर गद्दार असती वा स्वार्थी असती तर त्यांनी तीन – साडेतीन वर्षे संघर्ष केला नसता, इतका वेळ वाट पहिली नसती. असे असंख्य शिवसैनिक गेले ते सर्वच काही गद्दार नव्हते. आयाराम व संधीसाधूना प्रतिष्ठा व निष्ठावंतांची उपेक्षा व अवहेलना याला कंटाळून हे गेले. सध्या पक्षात जी गटबाजी, कम्पुशाही व पदाचा गैरवापर करून जो व्यापार चालला आहे, उमेदवारी व पद वाटप करताना होणारी सौदेबाजी याला कंटाळून हे सर्व जात आहेत. कोणीही गेले तर जाऊद्या, मला फरक पडत नाही, ज्याला जायचे असेल त्यांनी जावे, मी अडवणार नाही हे आत्मघातकी धोरण शिवसेना कमकुवत करण्यास कारणीभूत ठरत आहे.

मी “गद्दारांना क्षमा नाही” हा लेख संग्रह लिहिला त्यावेळी चाळीस आमदार व अकरा खासदार फुटले होते. तो पक्ष द्रोह होता, पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार होता, म्हणून मी वाट्टेल त्या शब्दात तुटून पडलो. इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार व खासदार फुटणे ही तशी संतापजनक बाब होती. परंतू इतकी मोठी फूट विनाकारण पडू शकत नाही, त्यामागे काहीतरी मोठे सबळ कारण असावे, याचा त्यावेळी मी विचारच केला नाही. परंतू गेल्या दोन वर्षात मला जो अनुभव येत आहे व जी दुय्यम व थर्ड क्लास वागणूक मिळत आहे त्यावरून त्यावेळची कल्पना व मन:स्थितीची कल्पना येते.

आम्ही ज्यांना गद्दार व घरभेदी म्हटले व सप्रमाण सिद्धही केले, त्याच्यावर कारवाई करणे दूर राहिले, तेच गळ्यातील ताईत बनले आहेत. आज एक फोटो पाहण्यात आला, उद्धव ठाकरें सोबत बसलेला एक पदाधिकारी ज्याने विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदाराकडून पंधरा लाख घेऊन पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले, नगरपालिका निवडणुकीतही भाजपाशी हात मिळवणी करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे काम करणार नाही,असे जाहिर केले, अश्या घरभेद्याना उद्धव ठाकरेजी, प्रतिष्ठा देत असतील, गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्याच्या भावाची स्वतः बरोबर जाहिरारित्या तुलना करीत असतील, तर निष्ठावंतांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा तो प्रकार आहे. या धोरणाला कंटाळून जे पक्ष सोडत आहेत, त्यांना मी कोणत्या तोंडाने गद्दार म्हणू. रोजच ही गळती लागली आहे, त्यामुळे आत्ता कोणा कोणाला गद्दार म्हणू. मी ज्यांना आदर्श मानतो असे एक ज्येष्ठ व वयोवृद्ध शिवसैनिक मला बोलले, दिलीप आत्ता जय महाराष्ट्र तरी कोणाला घालावा. तूही आत्ता तुझे लिखाण थांबव आणि या गोष्टीचे टेन्शन घेणे सोडून दे. ज्यांनी दखल घ्यावी म्हणून तू रक्ताचे पाणी करून वारंवार लिहितो, वाईटपणा घेतो, त्यांनाच काही पडली नाही तर ही शिवसेना का तुझ्या एकट्याची आहे. आपण शिवसेनेची भरभराट पहिली तसं ऱ्हास ही पाहण्याची तयारी ठेवूया.

Views: 65
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

सौ चुहे खाकर बिल्ली मातोश्री पोहची... ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)