• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

…आणि ठाकरेंची म्हणून एकविरा प्रसिध्दी पावली….एक दिवस कायस्थांचा’ उत्सवाने एकविरा भक्तांमध्ये नवचैतन्य आले….तुषार राजे यांचे मनोगत

माणगंगा by माणगंगा
December 22, 2025
in Uncategorized
0
…आणि ठाकरेंची म्हणून एकविरा प्रसिध्दी पावली….एक दिवस कायस्थांचा’ उत्सवाने एकविरा भक्तांमध्ये नवचैतन्य आले….तुषार राजे यांचे मनोगत

…आणि ठाकरेंची म्हणून एकविरा प्रसिध्दी पावली

एक दिवस कायस्थांचा’ उत्सवाने एकविरा भक्तांमध्ये नवचैतन्य आले.

तुषार राजे यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

कार्ला येथील एकविरा देवीचे नाव घेतले की ठाकरेंचे नाव पुढे येते. एकविरा देवी कोळी, सीकेपी समाजाची असली तरीही ठाकरे घराणे व अनंत तरे यांचा एकविरा देवस्थानशी थेट संबंध आला तो योगायोगाने धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळेच.

त्याचं असं झालं सुमारे ८०च्या दशकात (बहुधा १९७६-७७ साली) कार्ला वेहरगाव एकविरा परिसरातील परिस्थिती बिघडली होती. तेथील काही मंडळी थेट आनंद दिघे यांना भेटण्यासाठी ठाण्यात आली होती. ती मंडळी येणार आहे याची पूर्वकल्पना मला असल्याने मीसुध्दा तेथे होतो. खुप काही अपेक्षा घेऊन आलेल्या त्या मंडळींनी गडावरील एकूण स्थिती आनंद दिघे यांच्या कानावर घातली. तुम्ही एकविरा मंदिराचा कारभार हातात घ्या’ असा त्यांचा आग्रह होता. एकविरा देवी सीकेपी समाजाचीसुध्दा आहे, तुमच्या समाजाचा फार पूर्वीपासून गडावर राबता आहे. त्यामुळे गडावर आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती तुम्हींच सांभाळू शकता. त्यांचे सर्व ऐकून घेतल्यानंतर आनंद दिघे यांनी शिवसेनाप्रमुखांशी संपर्क साधला. आणि तासाभरामध्ये आम्ही सर्व मातोश्रीकडे रवाना झालो.

कार्ला वेहरगाव येथून आलेल्या मंडळींना शिवसेनाप्रमुखांसमोर उभे करुन त्यांची कैफियत ऐकविली. त्यांनीही एकविरा मंदिर परिसरात असलेला सावळा गोंधळ शिवसेनाप्रमुखांना सविस्तर ऐकविला. आनंद दिघे यांनी एकविरा मंदिर संस्थानचे नेतृत्व करावे अशी त्यांची आग्रही मागणी होती.

शिवसेनाप्रमुखांनीही आनंद दिघे यांना लक्ष घालण्यास सांगितले. तथापि आनंद दिघे यांनी माझ्याऐवजी अनंत तरे यांच्याकडे जबाबदारी सोपवू या अशी विनंती केली. मी जर त्यात अडकलो तर जिल्ह्यात दुर्लक्ष होईल असे त्यांचे म्हणणे होते. अखेरीस त्यांना आठवडाभराने येण्यासाठी सांगून रवाना केले.

मातोश्रींवरुन आम्ही निघालो, येतांना मुलुंड येथे थांबलो. अनंत तरे बँक ऑफ इंडियाच्या मुलुंड शाखेत सेवेत होते. तेथे त्यांच्या कानावर सर्व घटना घालून शिवसेनाप्रमुखांनी एकविरा देवी संस्थानची जबाबदारी तुला घ्यायला सांगितली आहे असे अनंत तरे यांना सांगितले, असा झाला अनंत तरे यांचा एकविरा मंदिर संस्थानामध्ये तसेच शिवसेनेत थेट प्रवेश झाला. पुढे अनंत तरे यांनी बँकेची नोकरी सोडली आणि एकविरा संस्थानात लक्ष घातले. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ संस्थानचा कारभार पाहिला.

अनंत तरे यांनी एकविरा संस्थानचा कारभार घेतल्यानंतर त्यांनी प्रथम शिवसेनाप्रमुखांना एकविरा गडावर आणले व त्यांच्याहस्ते आपल्या कारभाराचा शुभारंभ केला. एकविरा देवी ही सीेकेपी समाजाची कुलदेवता म्हणून ओळखली जात होतीच त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाकरे कुटुंबाचा गडावर वावर सुरु झाला आणि अल्पावधीतच एकविरा देवी ही ठाकरेंची देवी असल्याची प्रसिध्द पावली. त्यापूर्वी अनेकदा शिवसेनाप्रमुख तथा ठाकरे कुटुंब डहाणूजवळील कासा येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जात असत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तथा ठाकरे कुटुंबाला एकविरा मंदिर परिसरात येण्याने तथा देवीच्या दर्शनाने मानसिक आणि शारिरीक बळ मिळत असल्याने त्यांचे कोणत्याही शुभप्रसंगी कार्ला एकविरा येथे येणे सुरु झाले. एकविरेंचे मुळ स्थान रायगड जिल्ह्यातील वेरळ येथे आहे. तेथेही ठाकरे कुटुंबांने दर्शनासाठी अनेकदा भेटी दिल्याने ठाकरेंची देवी एकविरा’ ही ख्याती आख्या हिंदुस्थानात पसरली. आजही एकविरा गडावर गेल्यास किंवा एकविरा भक्तांशी चर्चा केल्यास ठाकरे कुटुंबाने गडावर वारंवार यावे म्हणजे गडावर काहीतरी चांगले घडले अशी अपेक्षा अनेक भक्त व्यक्त करीत आहेत.

एक दिवस कायस्थांचा’ २०२० साली झालेल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे आले होते. त्यांनी आपल्या भाषणात आपण एकविरा गडावर प्रथमच येत आहोत, तथापि आपली पत्नी व मुली नेहमी येतात असे सांगून येथे येण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांना फोन केला तुमच्या देवीच्या दर्शनासाठी मी जात आहे. आपण आलात तर चांगले होईल, परंतु त्यासमयी अयोध्या दौरा असल्याने उध्दव ठाकरे येवू शकले नाहीत.

ठाकरेंची एकविरा ही प्रसिध्दी फक्त देवी भक्तांमध्ये नाही तर संपूर्ण देशात आहे. नव्वदीच्या दशकात कार्यक्रमा निमित्ताने मी कलकत्ता येथे गेलो होतो. तेथे सीकेपी म्हणजे काय ? हे अनेकांना समजलेंच नाही. कायस्थ सांगितल्यावरही मोठे प्रश्नचिन्ह होते परंतु त्या समारोहात असलेल्या एका उच्चशिक्षित महिलेने `अरे वो बाल ठाकरेंवाले सीकेपी कायस्थ हैं, एकविरा उनकी देवी हैं’ असे उत्स्फूर्तपणे सांगितले होते.

एकविरा मंदिर परिसरात सीकेपी समाजाच्या खूप जुना वावर आहे. सुमारे सतराशे अठराशे सालातील अनेक संदर्भ सापडतात. पूर्वी गडावर सीकेपी समाजाची धर्मशाळा होती. सीकेपींची अनेक लग्न कोणत्याही सुविधा नसतांना एकविरा गडावर होत असत. पुढे कालांतराने समाजाचे दुर्लक्ष झाले आणि गडावरील सीकेपी धर्मशाळा शासन दरबारी जमा झाली.

एकविरा देवस्थान हे पांडवकालिन आहे. पांडव वनवासात असतांना एकविरा पांडवांसमोर प्रगट झाली व त्यांना एका रात्रीत देऊळ बांधण्याची अट टाकली. देऊळ बांधल्यानंतर एकविरा माता प्रसन्न झाली आणि पांडवांना वनवासात व अज्ञातवासात कोणीही ओळखू शकणार नाही असा वर दिला. एकविरा परिसरात असलेली कार्ला लेणी पहिल्या शतकातील शिल्पकला असल्याचे सांगण्यात येते. एकविरा मातेची मुर्ती ही स्वयंभू पाषाणापासून तयार केली आहे. नवसाला पावणारी स्वयंभू एकविरा गडावर स्थानापन्न असून बाजूला जोगेश्वरी देवी आहे. स्वयंभू असलेल्या देवीचा तिन्ही लोकी नावलौकिक आहे. भगवान परशुराम या वीरपुत्राची जननी, जमदग्नी ऋषींची पत्नी. त्या काळातील भगवान परशुराम एकमेव वीरपुत्र असल्याने देवीला एक विरा’ या नावाने संबोधले जात असे. पुढे त्याचे नामकरण एकविरा’ असे झाले. एकविरेंचे आणखी एक मंदिर कर्नाटकातही आहे.

पूर्वींचे हेमांडपंथी असलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार १८६६ साली झाला. एकविरा भवानीचे जुने देवालय त्या काळातील एकविरेंचे निस्सिम भक्त मुंबईतील बाबुराव कुळकर्णी या सीकेपी भक्ताने मुंबईतील नागू पोसू वरळीकर व हरिप्पाचेर नाखवा या दोघांच्या मदतीने माघ शुध्द पंचमीला बांधून जिर्णोद्धार केला. बाबुराव कुळकर्णी यांच्या पुढाकाराने हे देऊळ बांधल्याचा उल्लेख आहे. तसा शिलालेख एकविरा मंदिर परिसरात आजही आहे.

सीकेपी समाज हा प्रामुख्याने काश्मिर व पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रात आला. प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या या समाजाने जेथे वास्तव्य केले तेथील देवीला आपली कुलदेवता मानले. परंतु समाजाची कुलदेवता ही एकविरा असल्याचे अनेक कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहे. आपल्या कुलदेवतेचा उत्सव करावा ही संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच २०१७ सालापासून एकविरा गडावर एक दिवस कायस्थांचा’ हा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. देशभरातील अनेक ज्ञातीबांधव या उत्सवात सहभागी होतो. आता ज्ञातींची विश्वस्त संस्था स्थापन करुन मंदिर परिसर किंवा आसपासच्या भागात सीकेपी समाजाची वास्तु उभारण्याचे काम यावर्षी उत्सवापासून सुरु होणार आहे. सीकेपी, कोळी, आगरी, सोनार, त्वष्टाकासार इत्यांदी समाजाची ही देवता म्हणून ओळखली जाते. त्याही पेक्षा ठाकरेंची देवी म्हणून देवीला एक वेगळेच नामाभिधान मिळाले आहे.
आजही एकविरा गडावर वृध्द मंडळींना जाणे जिकरीचे आहे. गडाच्या पायर्या असमान असल्याने चढणे अवघड होते. अनंत तरे आमदार असतांना त्यांच्या आमदार निधीतून गडाच्या मध्यभागापर्यंत रस्ता तयार करण्यात आला. पायर्यांची दुरुस्ती करण्यात पुरातत्व खात्याची अडचण येते. आदित्य ठाकरे पर्यटनमंत्री असतांना गडावर रोप-वे करण्याची योजना मंजूर केली, त्यासाठी निधीही राखून ठेवला. काही स्थानिकांचा विरोध असल्याने रोप-वे होऊ शकला नाही, परंतु आता त्याचे काम मार्गी लागले आहे. एकविरा मंदिराची नोंद शासन दरबारी होवून ते पर्यटन स्थळ व्हावे यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता.

एकविरा मंदिर हे पांडवकालिन असले तरीही ज्या समाजाची ही कुलदेवता आहे त्या समाजाला एकविरा विश्वस्त मंडळात कोणतेही स्थान मिळत नाही. संस्थानचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते कै. अनंत तरे यांनी त्याबाबतची व एकविरा मंदिर संस्थानची अयोग्य घटना बदलाची मागणी करणार्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. ज्येष्ठ विधीज्ञ अजित ताम्हाणे या याचिका पाहत आहेत. तथापि अनंत तरे यांच्या पश्चात याचिकांबाबत योग्य पाठपुरावा नसल्याने त्या प्रलंबित आहेत. सीकेपी समाजाने सुरु केलेल्या एक दिवस कायस्थांचा या उत्सवाने यापूर्वी एकत्र न येणारा समाज एकविरा उत्सवानिमित्ताने एकत्र येत आहे हेच एक दिवस कायस्थांचा’ या उत्सवाचे यश आहे.

कार्ला येथे एकविरा मंदिराच्या आवारातील शिलालेखाची माहिती.
१) श्री एकविरा भवानीचे जुने देवालय
२) बाबुराव कुळकर्णी यांचे विचारे करून
३) नाग्ग पोसु वरलीकर व हरीप्पाचेरनाक
४) वा फजींदार मुकांम मुंबई याणे धर्म
५) दायक बांधीले असे मीति माघ शु II५
६) शके १७८८ क्षयनाम संवत्छर –
श्री एकविरा भवानीचे जुने देवालय सीकेपी भक्त बाबुराव कुळकर्णी यांच्या विचाराने नाग पोसू वरलीकर व हरिप्पाचेर नाकवा फजींदार मुक्काम मुंबई यांनी धर्मार्थ बांधले.
मिती माघ शुद्ध ५ शके १७८८ क्षयनाम संवत्सर.
लेखातली तारीख फेब्रुवारी महिना, सन १८६६ आहे.

Views: 51
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अंतुली ग्रामपंचायतच उपसरपंचपदी जिजाबाई भील यांची वर्णी

अंतुली ग्रामपंचायतच उपसरपंचपदी जिजाबाई भील यांची वर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)