• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा .राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा . सादिक खाटिक

माणगंगा by माणगंगा
January 3, 2026
in Uncategorized
0
राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा .राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा . सादिक खाटिक

राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने आटपाडी नगरपंचायतीने प्रतिदिन साजरा करावा .

” ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट “, स्वातंत्र्य संग्राम सप्ताह म्हणून साजरा व्हावा .


आटपाडी प्रतिनिधी )


जन गण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने प्रत्येक दिवस साजरा करण्याची नवी प्रथा आटपाडी नगरपंचायतीने सुरू करावी . तसेच ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हे सात दिवस स्वातंत्र्य संग्राम सप्ताह म्हणून साजरा करीत आटपाडी नगरपंचायतीने देशात नवा आदर्श निर्माण करावा . अशी अपेक्षा, मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे .


प्रतिदिनी सकाळी योग्य वेळी आटपाडी नगरपंचायत मुख्यालयावरील लाऊड स्पीकर वरून प्रथम जन गण मन हे राष्ट्रगीत वाजवून आणि राष्ट्रगीता नंतर काही सेकंदाच्या अंतराने लगेचच वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत वाजवून दिवसाची सुरुवात केली जावी . ही नवी प्रथा आटपाडी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष, सर्व १७ नगरसेवक – नगरसेविका आणि अधिकारी, कर्मचारी बंधू – भगिनींनी सुरू करून देशात नवा इतिहास निर्माण करावा . राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत प्रतिदिवशी न चुकता सकाळी विशिष्ट वेळेत वाजविल्याने ही नवीन प्रथा भारतात पहिलीच ठरू शकेल . यामुळे आटपाडी नगरपंचायतीच्या या राष्ट्रप्रेमी, राष्ट्राभिमानी भुमिकेचा राज्यात, देशात मोठा गौरव होवू शकेल . आटपाडी नगरपंचायतीच्या या संदर्भातल्या यशस्वी भुमिकेनंतर आटपाडी तालुक्यातील सर्व गावच्या ग्रामपंचायतीतही याचे अनुकरून केले जाण्याची शक्यता आहे . आटपाडी नगरपंचायतीने राष्ट्रगीता बरोबर राष्ट्रीय गीत ही वाजविण्याचा भारतातला पहिला यशस्वी प्रयोग सुरू करावा . असे आवाहनही सादिक खाटीक यांनी आटपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, नगरसेवक – नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी आणि आटपाडी शहरवाशीयांना केले आहे .


दररोज राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत वाजविल्याने, १५ ऑगस्टचा स्वातंत्रदिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन, प्रतिदिनी असल्याचीच अनुभूती सर्वांना येवू शकते . तसे वातावरण निर्माण होणार असल्याने प्रत्येक नागरीकांच्या राष्ट्रभक्तीला अधिकाधिक बळकटी येणार आहे . औंध संस्थानचा मुख्य महाल असलेल्या आटपाडी तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावल्याचा मोठा इतिहास आहे .

देशभर, राज्यभर गाजलेल्या अनेक स्वातंत्र्य सेनानींना, त्यांच्या भूमिगत अवस्थेत आटपाडीत आश्रय देऊन त्यांच्या चळवळीला सहाय्य करण्याचे काम अनेक आटपाडीकरांनी त्याकाळात केले आहे . देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच आपल्या औंध संस्थानात लोकशाही राज्य व्यवस्था निर्माण करण्यात येथील संस्थानिक यशस्वी झाले होते . देशप्रेम ओतप्रोत भरलेल्या अनेक पिढ्या या भागाने दिल्या आहेत . सीमेवर लढणारे सैनिक, अधिकारी, मातब्बर साहित्यीक, लेखक, कवी, कथाकार, कलाकार, नकलाकार, बहुरूपी, राजकारणी, पत्रकार, खेळाडू, प्रत्येक क्षेत्रात आदर्श ठरणारी युवा पीढी, ज्येष्ट मान्यवर सुजान बंधू भगिनी, हे भागाचे मोठे वैशिष्ट्य आहे .

स्वातंत्रपूर्व काळात आटपाडी शहरासह तालुक्यातील अनेक गावातून भल्या पहाटे स्वातंत्र्याचा जयजयकार करणाऱ्या प्रभात फेऱ्या निघत असत . सेवादलाच्या माध्यमातून देशभक्तीपर अनेक उपक्रम राबविले जात असत. शालेय विद्यार्थ्यांपासून गावातील सर्व स्तरातील गावकरी, माता, भगिनी या प्रभात फेऱ्या मध्ये सहभागी होत . या ज्वलंत इतिहासाला अनुसरूनच प्रतिदिनी सकाळी राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत वाजवून देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवावी . याच निखळ भावनेतून राष्ट्रगीत – राष्ट्रीय गीत वाजविण्याच्या संबधीचे हे आवाहन मी आटपाडी शहरातील सर्वांना करीत आहे . काही कालावधीनंतर या चांगल्या प्रथेचे आटपाडी तालुक्यातील ६० गावच्या सर्व ५६ ग्रामपंचायतीतही अनुकरण केले जावू शकेल. तसेच राज्य – देशभर या प्रथेचे प्रचंड स्वागत होऊ शकणार असल्याने राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत प्रतिदिनी वाजविणेची देशात सर्वप्रथम सुरुवात केली म्हणून आटपाडी शहर आणि नगरपंचायतीच्या नावाने सर्वप्रथमतेचा नवा इतिहास निर्माण होणार आहे . आटपाडीचा मोठा गौरव होणार आहे .


आटपाडी नगरपंचायतीच्या मुख्यालयावर उंचावर लाऊड स्पीकर लावून राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत वाजविल्याने शहरात प्रतिदिनी राष्ट्रप्रेम जागृत होणार आहेच तथापि सर्वत्र उत्साह संचारणार आहे . विशिष्ट वेळेत वाजणार्‍या राष्ट्रगीताने रस्त्यावरून जाणारे – येणारे, परिसरात वावरणारे, शेतात, व्यवसायात राबणारे, आवाज जाईल तेथ पर्यतचे शहरवासीय बंधु, भगिनी, विद्यार्थी वगैरे सर्वजण हातातील सर्व कामे टाकून राष्ट्रगीत वाजताना उभे राहतील . राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत वादनाचा यथोचित सन्मान करतील . राष्ट्रगीत वाजतानाची आचारसंहिता सर्वांनाच माहीत असल्याने आणि राष्ट्रगीत वाजविण्याने ही आचारसंहिता प्रत्येकाच्या नित्याचाच भाग बनेल . राष्ट्रगीता बरोबर राष्ट्रीय गीताच्या वाजन्याने मोठे राष्ट्रीय श्रध्देचे मंगलमय वातावरण प्रतिदिनी पहायला मिळेल .

आटपाडी नगरपंचायतींच्या सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी या सुचनेचा स्वीकार करून आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत प्रतिदिनी वाजवण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु करावा .
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ९ ऑगस्ट १९४२ आणि १५ ऑगस्ट १९४७ या दोन ऐतिहासीक दिवसांना असलेले अनन्य साधारण महत्व लक्षात घेवून ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हे सात दिवस भारतीय स्वातंत्र्याचा प्रचंड जागर करणारा स्वातंत्र्य संग्राम सप्ताह म्हणून साजरा केला जावा. या सप्ताहाची देशात सर्वप्रथम सुरुवात आटपाडी नगरपंचायतीने करावी .


भारतातील दीडशेहून अधिक वर्षाची ब्रिटीशांची सत्ता संपविण्यासाठी शतकाहून अधिक काळ सुरु असलेला स्वातंत्र्य लढ्याचा संघर्ष अंतिम टप्प्यात आला असताना महात्मा गांधींनी दिलेला ” करो या मरो ” या अंतिम नाऱ्यातून भारत छोडो या आंदोलनाची सुरुवात ९ ऑगस्ट १९४२ रोजी करण्यात आली होती आणि तब्बल ५ वर्षाच्या प्रखर लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले . कोट्यावधी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रचंड त्याग, समर्पण आणि बलिदानातून मिळालेले भारतीय स्वातंत्र्य असून ९ ऑगस्ट क्रांती दिन, १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन, हे सारे जहाँतले सर्वोच्य भारतीय दिवस म्हणूनच शतकानुशतके साजरे होणार आहेतच. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऑगस्ट क्रांती दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन क्रांतीकारी ऐतिहासीक दिवसांना जोडणारा सात दिवसाचा स्वातंत्र्य संग्राम सप्ताह, आटपाडी नगरपंचायतीने साजरा करून, क्रांतीकारकांच्या बलिदानाचा, प्रचंड त्याग, समपर्णाचा प्रचंड गौरव केला पाहिजे .


हा स्वातंत्र्य संग्राम सप्ताह सर्वोत्तम आणि सर्वोच्य उत्सव ठरावा, असे या सप्ताहाला स्वरूप दिले गेले पाहिजे . स्वातंत्र्य संग्राम सप्ताहाच्या अनुषंगाने या सप्ताहातल्या प्रत्येक दिवशी नगरपंचायत कार्यक्षेत्राच्या काना – कोपऱ्या पर्यंत, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शहीद झालेल्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांची महती सांगीतली गेली पाहिजे. या शहीद वीरांसह हाल, अपेष्टा, अन्याय, अत्याचार, तुरुंगवास, मरणप्राय यातनांना सामोरे गेलेल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या नावांचे फलक, शहरासह, शहरात सहभागी प्रत्येक वाडी, वस्तीची नवी ओळख बनली पाहीजे, आटपाडी शहरात महत्वाच्या ठिकाणी प्रतिकात्मक शहीद स्मारक साकारून तेथे स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास सर्वांसाठी उपलब्ध केला पाहीजे. भारतीय संविधानाचा जागर या शहीद स्मारकातून मुख्यत्वे केला गेला पाहिजे . हा साजरा होणारा स्वातंत्र्य संग्राम सप्ताह संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष वेधून घेणारा, लोकशाही समृद्ध करणारा, मानवता, बंधुभाव आणि प्रेम वाढीस लावणारा सबका सप्ताह ठरला पाहीजे . शहरातील सर्वच व्यवस्था, सर्व कुटूंबे, सर्व नागरीक या सप्ताहाचा भाग बनावेत, असे सर्वव्यापी, सर्वस्पर्शी, सर्वप्रिय, सर्वोत्तम उपक्रम या सप्ताहाची महती वाढविणारे भाग ठरावेत. याकडे सादिक खाटीक यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे .

Views: 26
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मोर्वा शाळेत अवतरल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले”बालिका दिनानिमित शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन “

मोर्वा शाळेत अवतरल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले"बालिका दिनानिमित शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)