डॉ सुप्रिया कदम साळुंखे, यांचा सन्मान होणार…..
आटपाडी येथे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित “राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त विशेष महिला सन्मान सोहळा” अंतर्गत डॉ. सुप्रिया श्रीप्रसाद कदम (आटपाडी) यांची समाजरत्न महिला सन्मान पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजासाठी केलेले वैद्यकीय, सामाजिक व प्रेरणादायी कार्य, तसेच दाखवलेली जिद्द व चिकाटी याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात येणार आहे.सदर सन्मान सोहळा दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता शिवप्रताप मल्टीस्टेट शाखा, आटपाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.


