माण चौफेर चे बापूसाहेब मिसाळ चैतन्य पुरस्काराने सन्मानित
दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे
दहिवडी येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद असणाऱ्या चैतन्य अकॅडमी तर्फे देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार माणदेशी मातीतील काही तप पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या बापूसाहेब मिसाळ यांना देण्यात आला. ग्रामविकास मंत्री राज्याचे कार्यशील नेतृत्व जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई गोरे यांच्या हस्ते तर चैतन्य अकॅडमी चे सर्वेसर्वा संचालक संदीप खाडे यांच्या माध्यमातून वितरण करण्यात आले
यावेळी बापूसाहेब मिसाळ यांनी त्यांच्या लेखणीला मिळालेलं बळ आहे ते तेवत ठेऊ कुठेही झुकणार नसून तालुक्यातील सर्वच पत्रकार ते वारसा जपत आहेत असे मत व्यक्त केलेत्यांनी केलेल्या विविध कामातून पत्रकारितेच्या माध्यमातून संपादन केलेला जनतेच विश्वास , लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळालेला न्याय हीच चैतन्य पुरस्कार पावती असून ही लेखणी कधीच सर्वसामान्यांसाठी बोथट होणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले ते चैतन्य कॅडमीच्या माध्यमातून तालुक्यातून असामान्य कर्तृत्व असणाऱ्या अवलियांचा तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार संपादक बंधू चा सन्मान करण्यात आला
बाबासाहेबांना मिळालेला पुरस्कार हा सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान आहे तर अनेक वर्षे पत्रकारितेत केल्याला कामाची पोच पावती आहे असे मत सर्व पत्रकार बांधव व तालुकवासीय जनतेचे असून तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे


