• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

प्रभाग क्र. 18 च्या निवडणुकीत अनेक दिग्गज आपसात भिडणार परिवर्तन नक्की……ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
January 11, 2026
in Uncategorized
0
भाजपा व शिवसेना लालपरीहात दाखवाल तिथे थांबते….. ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

प्रभाग क्र. 18 च्या निवडणुकीत अनेक दिग्गज आपसात भिडणार परिवर्तन नक्की

ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

प्रभाग क्र. 18 हा अनेक आजी माजी नगरसेवक व ज्येष्ठ समाज सेवक निवडणुकीच्या रिंगणात असलेला प्रभाग आहे. 2017 च्या निवडणुकीत PRP चे नेते प्रमोद टाले, भाजपचे राजेश वानखेडे, भारिप बहुजन पार्टीचे कविता सुधीर बागुल व काँग्रेस च्या श्रीमती अंजली चंद्रकांत साळवे हे उमदेवार निवडून आले होते. याचाच अर्थ या प्रभागातील मतदार हे चोखंडळ असून ते सरसकट एकाच पक्षाच्या पॅनलला मत देत नाहीत तर उमेदवार व त्याची योग्यता पारखून मतदान करतात. हा प्रभाग आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असल्याने प्रत्येक निवडणुकीत येथे उमेदवारांची मांदियाळी असते. त्यामुळे लढत चूरशीची होऊन विजयी उमेदवार अल्प मताधिक्याने निवडून येतो.

यंदा प्रभाग 18 मधून अ मध्ये आठ ब मधून नऊ क मधून चौदा तर ड मधून दहा असे चार जागां साठी एकूण एकेचाळीस उमेदवार आपसात भिडले आहेत.

यात माजी नगरसेविका अंजली साळवे, लता शांताराम निकम, बागुल कविता सुधीर, राजेश वानखेडे व प्रमोद टाले हे पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. या शिवाय शारदाताई अंभोरे सुरेखा सुरेश सोनवणे, कोजगे राहुल प्रल्हाद, विजय लालसिंग ठाकूर, विकास खरात, ऍड. जय गायकवाड, जाधव रोहिदास मारुती या सारखे मान्यवर सामाजिक व राजकीय कार्यकर्ते निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे कोणत्या निशाणीचे दाबू बटन? अशी संभ्रमावस्था मतदारांची झाली आहे. कारण जिंकणार फक्त चार आणि पराभूत होणार 37 ! यांत कोण बाजीगर होईल हे कोणत्याही राजकीय समीक्षकाला सांगणे कठीण आहे.

असे असले तरी या प्रभागाचा इतिहास पाहता तोच नगरसेवक पुन्हा निवडून येत नाही. या वेळी अंजली साळवे यांना लता शांताराम निकम या तगड्या उमेदवाराशी टक्कर द्यावी लागणार आहे. शिवाय शारदाताई अंभोरे, अश्विनी शिरसाट यांचे मत विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते? हा मुद्दा निर्णायक ठरेल. अनुक्रमे रोहित साळवे व शांताराम निकम या स्थानिक नेत्यांचा प्रभाव ही यशापयशात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

तोच प्रकार प्रभाग 18 च्या ब मध्ये आहे. PRP चे नेते व माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी आपली अभिनेत्री असलेली कन्या अक्षता टाले यांना रिंगणात उतरवून त्यांची कारकिर्द पणाला लावली आहे. त्यांच्या विरोधात वृषाली पाटील घड्याळ, वंदना रहाणे, कमळ, व सुरेखा सुरेश सोनावणे- वंचित, या तगड्या उमेदवार आहेत. हा प्रभाग घराणेशाहिला थारा देत नाही, परंतू प्रमोद टाले अक्षता टाले यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. यांत कोण बाजी मारेल हे मतदारच ठरवतील.

प्रभाग क्र. 18 क मध्ये तर एकाहून एक दिग्गज रिंगणात आहेत. विद्यमान नगरसेविका कविता बागुल यांना या निवडणुकीत कडवा विरोध सहन करावा लागेल. उबाठा शिव सेनेचे राहुल कोजगे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे अरविंद घोडेराव, बसपाच्या शकुंतला जगताप, काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार विजय ठाकूर, वंचितचे जुने जाणते कार्यकर्ते विकास खरात, आणि तरुण तडफदार समाजसेवक ऍड. जय गायकवाड असे एकसेबढकर एक उमेदवार असल्याने मतदार संभ्रमात पडले नाहीत तरच नवल. एक मात्र नक्की या वेळी परिवर्तन होणार आहे. जय पराजय ठरवणारे मताधिक्य 50-100 च्या आतच असेल.

प्रभाग क्र. 18 ड मध्ये विध्यमान नगरसेवक राजेश वानखेडे हे पुन्हा नशीब अजमावीत आहेत. निष्ठा व त्याग याचा लवलेश नसलेला हा कार्यकर्ता आहे. कधी शिव सेना, कधी भाजपा, तर विधानसभा निवडणुकीत उबाठा शिवसेना व आत्ता पुन्हा नगरसेवक पदासाठी भाजप अश्या बेडूक उड्या मारणारा उमेदवार जनमानसातून पार उतरून गेला आहे. या प्रभागातील आंबेडकरवादी मतदार अश्या वैयक्तिक स्वार्थासाठी रोज नवा घरोबा करणाऱ्या उमेदवारास तडीपार केल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यमान नगरसेवक सेवक प्रमोद टाले त्यांना चारिमुंड्या चित्त करण्याची ताकत ठेवतात. उबाठा शिव सेनेच्या सविता दिवटे, मनसेचे प्रमोद पालकर व राष्ट्रवादी चे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कपूर हे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे ते किती मते घेतात यावर जय पराजय ठरेल. येथे परिवर्तन नक्कीच होईल, यात शंका नाही.

Views: 88
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आचारसंहिता भंगाप्रकरणी काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल; प्रकरण पुढील चौकशीसाठी मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आचारसंहिता भंगाप्रकरणी काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल; प्रकरण पुढील चौकशीसाठी मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)