• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आचारसंहिता भंगाप्रकरणी काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल; प्रकरण पुढील चौकशीसाठी मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडे

माणगंगा by माणगंगा
January 11, 2026
in Uncategorized
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आचारसंहिता भंगाप्रकरणी काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल; प्रकरण पुढील चौकशीसाठी मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आचारसंहिता भंगाप्रकरणी काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल; प्रकरण पुढील चौकशीसाठी मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडे

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

निवडणूक काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रचारासाठी वापर केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत दखल घेतली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दिली.

दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो रेल्वे परिसरात एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत ही निवडणूक आचारसंहितेचा स्पष्ट भंग असल्याचा आरोप काँग्रेसच्या तक्रारीत करण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडीओ पुरावे, घटनाक्रम आणि कायदेशीर मुद्दे सविस्तर स्वरूपात तक्रारीसोबत सादर करण्यात आले होते.

या प्रकरणाची प्राथमिक छाननी केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण मुंबई महानगरपालिका (MCGM) प्रशासनाकडे पाठवले आहे. आयोगाने MCGM अधिकाऱ्यांना अधिकृत ई-मेलद्वारे चौकशी व अहवाल सादर करण्याबाबत कळवले असून, त्या ई-मेलची प्रत तक्रारदारालाही पाठवण्यात आली आहे.

तक्रारीतील प्रमुख मुद्दे :

  • निवडणूक काळात मुंबई मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रचारासाठी वापर
  • शासकीय यंत्रणेच्या संभाव्य गैरवापराचा प्रश्न, ज्यामध्ये परवानग्या व समन्वयाचा समावेश
  • वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह असमान व विशेष सुरक्षा बंदोबस्त
  • माध्यमांच्या उपस्थितीत प्रचारात्मक स्वरूपाची मुलाखत

हे सर्व मुद्दे निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, समान संधीचे तत्त्व आणि लोकशाही मूल्यांशी थेट संबंधित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेसची भूमिका:

या संदर्भात बोलताना प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे म्हणाले, ”निवडणूक काळात मुख्यमंत्री स्वतः सार्वजनिक मालमत्ता आणि शासकीय यंत्रणेचा प्रचारासाठी वापर करत असतील, तर तो आचारसंहितेचा गंभीर आणि जाणीवपूर्वक भंग आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. पद कितीही मोठे असले तरी नियमांचे पालन बंधनकारक आहे. या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाने केवळ औपचारिक नव्हे, तर कठोर आणि उदाहरणार्थ कारवाई करावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.”

पुढील भूमिका :

सदर प्रकरण सध्या सक्षम विचाराधीन असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, निष्पक्षता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व कायदेशीर व लोकशाही मार्ग काँग्रेस अवलंबेल, असेही धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी स्पष्ट केले.

Views: 54
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
भाजपा व शिवसेना लालपरीहात दाखवाल तिथे थांबते….. ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

प्रभाग 14 मध्ये माजी नगरसेवकांचे भवितव्य ठरणार : नव्यांना संधी..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)