कौन बनेगा उल्हासनगर का महापौर?ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर महापालिकेचा महापौर कोण होणार? याची चर्चा रंगात आली आहे. शिव सेना व भाजपा या दोन्ही मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
एकीकडे भाजपा म्हणतो,तो आमचाच महापौर होणार तर शिवसेना म्हणते आमचाच महापौर होणार!ही परिस्थिती उद्भवण्याचे कारणही तसेच रंजक आहे. महापालिकेत 78 नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेसाठी किमान 40 नगरसेवकांचे पाठबळ हवे आहे. आणि ते ना भाजपा कडे आहे ना शिवसेनेकडे आहे. भाजपा कडे 37 नगरसेवक असून शिवसेना TOK साईं पार्टीचे मिळून 36 नगरसेवक निवडून आले आहेत. यात सविता तोरणे ह्या अपक्ष म्हणून जरी निवडून आल्या असल्या तरी त्या TOK म्हणजेच शिव सेनेच्या समर्थक असल्याने संख्याबळ शिव सेना 37 व भाजपा 37 असे समसमान झाले आहे.
आत्ता सत्ता स्थापने साठी किमान 3 नगरसेवक हवेत. त्यातील 2 प्रथमच निवडून आलेल्या वंचित कडे आहे. तर काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका सौ. अंजली साळवे ह्या देखील महा विकास आघाडी समर्थक आहेत. तसेच साईं पार्टीचा एक नगरसेवक आहे. या चौघानी शिवसेनेस साथ दिली तर शिवसेनेचे संख्याबळ 40 हा जादूई आकडा पार कारभार सत्ता स्थापन करू शकेल. मात्र भाजपा ही सहजासहजी सत्ता हातची जाऊ देणार नाही. एरवी नगण्य असलेले दोन हे संख्याबळ कमालीचे मौल्यवान झाले आहे. यातूनच घोडेबाजार होणार आहे. भाजपा सोबत वंचित जाणे हे ध्येय्य धोरणाच्या विरुद्ध होईल व ज्यांचा विरोध करण्यासाठी मतदारांनी निवडून दिले त्यांचा घात करण्यासारखे होईल. अंबरनाथ नगरपालिकेत जसे काँग्रेसचे 12 नगरसेवक एका क्षणात भाजपात गटात गेले तसे जर भाजपने सौदेबाजी करून हे चार नगरसेवक आपल्याकडे खेचून नेले तर भाजपा 40 वर पोहचू शकेल. त्यामुळे सत्ता कोणाची येणार? हे ठरविण्याचा अधिकार वंचितच्या दोन नगर सेवकांप्रमाणेच काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांच्या हातात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल, त्यासाठी शिव सेना व भाजपात स्पर्धा लागेल. कोट्यावधीचे पॅकेज दिले जाईल, पदाची आश्वासने दिली जातील. वंचित तत्वाला जागते कि तत्वाशी काडीमोड घेऊन सौदेबाजीत आपले सोने करून घेऊन सत्ताधाऱ्यांची पाठराखण करते ? यावरच महापौर कोणाचा होईल हे ठरेल ?


