• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिवसेना ही अक्षय आहे, ती कधी संपणार नाही हे आम्ही दाखवून दिलेगद्दारांचे माकडहाडच मोडले !!ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
January 24, 2026
in Uncategorized
0
भाजपा व शिवसेना लालपरीहात दाखवाल तिथे थांबते….. ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

शिवसेना ही अक्षय आहे, ती कधी संपणार नाही हे आम्ही दाखवून दिलेगद्दारांचे माकडहाडच मोडले !!ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर तसेच कल्याण मध्ये शिवसेना संपविण्याचा वीडा काहींनी उचलला, शिवसेनेचे ठाणे व ठाण्याची शिवसेना अशी ख्याती असलेल्या ठाण्यात केवळ एकाच जागी मशाल पेटली, हे किती मोठे दुर्दैव! कल्याणमध्ये 11 नगरसेवक मशालीवर निवडून आले त्यातील चार एका झटक्यात गद्दार झाले. ज्या मतदारांनी भाजपा व शिंदेसेने विरोधात मतदान करून निवडून आणले, तुम्हाला विजयी करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी व कार्यकर्त्यांनी दिनरात मेहनत घेतली, मतदारांची मानधरणी केली त्या सर्वांशी बेईमानी करून शिंदेसेनेची विष्ठा चाटायला गेलात.

लाज लज्जा सर्व कोळून प्यालयात. कश्यासाठी तर सत्तेच्या चतकोर तुकडयासाठी व काही लाखांसाठी? आत्मा मारून तुम्ही त्याची किंमत वसुल केली.दुसरीकडे मनसेने आपले बंधुप्रेम हे बेगडी असल्याचे सिद्ध केले. ज्या शिंदे सेनेवर दिवसरात्र दुगुण्या झाडल्या, गद्दार ~गद्दार म्हणून उद्धार केला, त्या मिंधे सेनेत सामील झालात. आणि वरून विकासाचे कारण देता ? मतदार काय तुम्हाला दूधखुळे वाटले का ? लोक इंजिनला मतदान का करीत नाहीत, आणि का करू नये, हे सिद्ध करणारी घातकी कृती मनसेने केली. कदाचित माजी आमदार राजू पाटील यांना विधान परिषदेचे वेध लागले असतील, त्या बदल्यात ही सौदेबाजी केली असेल.उल्हासनगर महापालिकेत तर भयंकर विपरीत परिस्थिती उद्भवली.

ज्या नाठाळाच्या हातात AB फॉर्म देऊन निवडणुकीची जबाबदारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोपवली तोच रातोरात भाजपासोबत शैयासोबत करून भाजपचा उमेदवार म्हणून मतदारासमोर आला, त्याला भुईसपाट करून त्याचे नाकच कापले. आत्ता नाकाची कापलेली भोकं लपवत तो फिरत आहे. यावरही शिवसेनेने मात केली. ऐनवेळी प्रभारी जिल्हा प्रमुख नेमला. चाळीस उमेदवार रिंगणात उतरवले आणि जे निष्ठावंत उरले होते, त्यांच्या बळावर निवडणूक लढवली. बाबासाहेबांच्या – “लढला नाहीस तरी विकला जाऊ नकोस,” या वचनाच्याही पुढची पायरी गाठत ते चाळीस मावळे बिकट परिस्थितीत लढले पण विकलेही गेले नाहीत. जरी ते सर्वच्या सर्व पराभूत झाले तरी त्यांनी गद्दार, थैलीशहा व सौदेबांजांशी कडवी झुंज दिली, आर्थिक पाठबळ नाही, एकाही नेत्याची सभा नाही तरी अमाप पैसा खर्च करणाऱ्या समोर दंड थोपटून उभे राहिले. कोणी- हजार, कोणी= दोन हजार तर काहींनी तीन हजार मतं घेतली.

याला म्हणतात, बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, “सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नही!” या निर्धाराने लढले. त्या उलट शिव सेनेच्या वटवृक्षाची तीस वर्षे फळं चाखणारी बांडगुलं, गिधाडं आणि वटवाघूळे भाजपाच्या फांदीवर जाऊन बसले व फांदीसह ढुंगणावर आपटले. त्यांचा मणकाच नव्हे तर माकड हाडही मोडले. पक्षाच्या नेत्यांनाही उमगले कि ज्यांना आपण वाघ समजत होतो ते लांडगे निघाले.या पराभवाने निष्ठावंत शिवसैनिक तावून सुलाखून निघाला आहे. यापेक्षा वाईट परिस्थिती येऊच शकत नाही.

मी गेली दोन वर्षे या घरभेदी बांडगुळावर लिहीत होतो, तेंव्हा मला पक्ष विरोधी ठरवले मात्र मी जे लिहीत होतो त्यामुळे, मी कसा पक्ष हितरक्षणासाठी या अनाजीला उघडे पाडून पक्ष नेतृत्वास सावध करीत होतो, तेच सिद्ध झाले आहे. अनेक स्वार्थी नेते, पदाधिकारी गद्दार झाले तरी निष्ठावंत शिवसैनिक होता तिथेच आहे. त्यामुळे उडाले ते कावळे व राहिले ते मावळे असे समजून मूळ शिवसेनेस नव्याने उभारी देण्यासाठी सज्ज होऊन आपल्या ओरिजिनल शिवसेनेचे पुन्हा सुवर्णयुग आणूया, असा निर्धार हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षां निमित्ताने निष्ठावंत शिवसैनिकांनी केला आहे.

Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मुंबईफाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

मुंबईफाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)