• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुंबईफाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

माणगंगा by माणगंगा
January 25, 2026
in Uncategorized
0
मुंबईफाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

मुंबईफाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.काल, म्हणजे २३ जानेवारी २०२६ रोजी षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षांरंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मी गेलो होतो.

या सोहळ्यात उद्धव व राज ठाकरे दोघेही उपस्थित होते. सुदैवाने टीव्ही चॅनेलवाल्यांनी यावेळी त्यांच्या भेटींचा हिशेब मांडला नाही! चॅनेलवाल्यांमध्येदेखील ‘आनंदजी डोसा’ आहेतच… ‘मी जेव्हा बाहेर पडलो, त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, तर ते घर सोडणं होतं. या सगळ्या गोष्टींना आता वीस वर्षांचा काळ निघून गेला आहे. अनेक गोष्टी मला उमजल्या आणि उद्धवनाही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता!’ असे उद्गार जेव्हा राज यांनी काढले, तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला… सलीम-जावेद यापैकी खास करून सलीम यांच्याशी राज यांची मैत्री आहे. सलीम-जावेद यांच्या गोळीबंद पटकथा-संवादाप्रमाणेच राज हे नेहमीच अत्यंत मोजके, पण प्रभावी बोलतात. त्यांच्या बोलण्यातले एकही वाक्य वा शब्द काढून टाकण्यासारखा नसतो. मुळात ते बाळासाहेबांप्रमाणेच व्यंगचित्रकार असल्यामुळे, थोड्या फटकाऱ्यांमध्ये काय ते सांगून जातात..

. राज यांनी ‘त्या वीस वर्षांचा’ उल्लेख केला, तेव्हा रश्मी वहिनींचे देखील डोळे पाणावले होते… परेश दाभोळकर यांनी गीत, संगीत आणि पोस्टमनच्या वेषात येऊन बाळासाहेबांच्या काल्पनिक पत्रातून महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्याचे काम पुन्हा एकदा केले. त्यांच्या सुरेख कार्यक्रमातील तरुण गायकाने जे शिवसेनागीत गायले, ते अक्षरशः कमालीचे होते! मुळात हे शिवसेनागीत अत्यंत जोशपूर्ण आणि जबराट आहे. दाभोळकर यांच्या संचातील जो तरुण गायक होता, त्याचा आवाज मर्दानी आणि पहाडी. अवधूत गुप्तेच्याच तोडीचस तोड, असे तो गायला. परेश यांनी बाळासाहेब यांचे काल्पनिक पत्र वाचून दाखवले,

तेव्हा उद्धवजींपासून अनेक शिवसैनिकांचे डोळे ओले झाले होते… माझे स्नेही आणि माजी आमदार व शिवसेना उपनेते अशोक धात्रक यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या..बाळासाहेबांच्या भावना पटकन अशाप्रकारे सहसा प्रकट होत नसल्या, तरीदेखील ज्यांना त्यांनी डेव्हलप केले, संधी दिली त्यांनीच घात केल्यावर, बाळासाहेबांना वाईट वाटतच असणार आणि वाईट वाटत होतेच. ज्या माणसाशी, शिवसैनिकाशी किंवा नेत्याशी बाळासाहेबांचे भावनिक नाते जडले होते, त्या नात्याशी त्या माणसानेच प्रतारणा केल्यामुळे बाळासाहेबांच्या काळजात खोल जखम होतच असणार..

. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, कालच्या सभेत राज यांनीही येऊर येथील बाळासाहेबांचा एक किस्सा सांगितला. त्यामध्ये आपल्या गरीब शिवसैनिकाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बाळासाहेब त्याला तोशीस पडू नये, याची कशी काळजी घेत होते, हे लक्षात आले. अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. परंतु राज यांनी अत्यंत काळजाचा ठाव घेता घेईल अशा पद्धतीने हा प्रसंग मूर्तिमंत उभा केला… राज यांच्या भाषणाचा परफॉर्मन्स एखाद्या कसलेल्या नटासारखा वाटतो. खर्जातला आवाज, त्यातले चढ-उतार, उत्कटता, आक्रमकता आणि पाॅझेस! बाळासाहेबांवरील पत्रसंवादात्मक कार्यक्रम सुरू असताना, अचानक एक वयस्कर व्यक्ती उद्धवजींसमोर आली आणि ओक्साबोक्शी रडत त्यांच्या पायावर त्या पुरुषाने डोके ठेवले.

बाळासाहेबांच्या आठवणीने तो माणूस अक्षरश: गदगदलेला होता… उद्धवजींनी त्याला उठवले आणि नंतर डबडबलेल्या डोळ्यांनी आणि हुंदके देतच, तो माणूस मागच्या आसनावर बसण्यासाठी गेला… टिपिकल ‘तटस्थ’ आणि ‘संतुलित’ वगैरे व्यक्ती याची आपल्याकडे कोणी बघत नाही असे पाहून याची टिंगलही करू शकेल..

. पण मी तसे करणार नाही. तो गदगदलेला माणूस हेच मला शिवसेनेचे आद्य वैशिष्ट्य वाटते. शिवसेना भावनिक राजकारण करत आली, हे सर्वश्रुत आहे. परंतु शिवसैनिकांचे परस्परांशी नातेही अत्यंत मजबूत असते. अरविंद भोसले यांनी नारायण राणेंचा पराभव होईपर्यंत अनवाणी वावरण्याचा पण केला होता. त्यासाठी नऊ वर्षे ते अनवाणी फिरत होते. हाच खरा पीळदार शिवसैनिक! शिवसेनेत असे असंख्य सामान्य कार्यकर्ते आहेत की, बाळासाहेबांचे कुटुंब हे आपलेच आहे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांना जपले पाहिजे, असे त्यांना मनोमन वाटते. उद्धवजी शक्यतो ‘मातोश्री’तच असतात, कारण भेटायला येणाऱ्यांना आजही ‘मातोश्री’वरच यायचे असते. कारण मातोश्रीला ते मंदिरच समजतात…

बाळासाहेब, उद्धव, राज, आदित्य, अमित वगैरे सर्वजण हे महाराष्ट्रासाठी काम करत आहेत. म्हणून त्यांच्या मागे आपण उभे राहिलेच पाहिजे, ही या मावळ्यांची भावना. एखाद्या पक्षाच्या दृष्टीने ही भावना म्हणजे मौलिक भांडवलच आहे.त्यामुळे ‘ठाकरे, ठाकरे’ हे गीत सुरू असताना, सभागृहातील शिवसैनिक उसळून अक्षरशः बेभानपणे नाचत होते. त्यांच्या अंगात स्फुरण चढले होते आणि सुषमाताई अंधारेदेखील त्या आनंदात सामील झाल्या होत्या… शिवसेना व मनसेची ताकद मतांच्या आधारावर मोजायची, तर पूर्वीपेक्षा ती कमी झाली आहे. परंतु दोन्ही पक्षांचा हा जो भावनिक पाया आहे आणि दोन्ही पक्षांतील नेतृत्वाशी तळागाळातील सैनिकाचे जे नाते आहे,

तीच त्या पक्षांची खरी ताकद आहे.ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्या कार्यक्रमास मी उपस्थित होतो. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना मी भेटलो होतो. अनेकजण माझ्याजवळ मन मोकळे करत होते. ‘हा सोहळा पाहण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख हवे होते’, अशा भावना अनेकांनी माझ्याजवळ व्यक्त केल्या होत्या. पुण्याहून तर मोहन यादव हे भगव्या रंगात सजवलेल्या दुचाकीतून तेथे आले होते. त्यावर शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे त्यांनी लटकवलेली होती. शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यावर खूप प्रेम केले. नांदेडचे धोंडू पाटील हे कित्येक वर्षांपासूनचे शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक. त्यांची आणि बाळासाहेबांची १९९२ साली प्रथम ओळख झाली. कपाळावर टिळा, गळ्यात भगवा रुमाल आणि साधी राहणी ही धोंडू यांची ओळख. ‘बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला की नवीन शक्ती व ऊर्जा मिळायची’, अशी आठवण त्यांनी तेव्हा सांगितली होती. त्या काळातील शिवसेनेचे एक नेते दीपक सावंत यांच्यासोबत ते बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना पाहून, ‘अरे, हा अनंत तरेसारखा दिसतोय!’ असे म्हणत बाळासाहेबांनी त्यांची गंमतही केली होती… राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर पहिली विराट सभा नांदेडला घेण्यात आली होती. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, म्हणून सोन्याच्या नांगराची बाळासाहेबांच्या हस्ते पूजा करण्यात आली

होती. या सभेच्या तयारीची आठवण धोंडू यांनी सांगितली होती.२०२२ मध्ये उद्धवजींनी ‘वर्षा’ सोडले, तेव्हादेखील अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.जे कट्टर शिवसैनिक असतात, ते कधीच गद्दारी करत नाहीत आणि जे गद्दारी करतात, ते कधीच शिवसैनिक होऊ शकत नाहीत, अशी एक पोस्टदेखील तेव्हा व्हायरल झाली होती. वीस वर्षानंतर शिवसेना भवनात येताच राज ठाकरे भावुक झाले होते. ‘आज खूप वर्षानंतर मी सेनाभवनात आलो. नवीन शिवसेना भवन पहिल्यांदा बघतोय. माझ्या मनात कायम कोरल्या गेलेल्या सगळ्या आठवणी, या जुन्या शिवसेना भवनातील आहेत. त्या खूप रोमांचकारी आणि आनंददायी आहेत’, असे राज म्हणाले होते. ‘एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून’ असे पाडगावकर लिहून गेले होते. त्या धर्तीवर बाळासाहेब व सेना भवन, मातोश्री हे राज यांच्या मनात खोल रुतून बसले आहेत. बाळासाहेबांवर व्याख्याने देण्याचा त्यांचा मनोदय असून, ही कल्पनाच उत्तम आहे.

लवकरात लवकर त्यांनी ही व्याख्याने देण्यास सुरुवात करावी, अशी विनंती.बाळासाहेबांमध्ये एक प्रकारची उत्स्फूर्तता होती. कोणत्याही अर्थाने ते कॅल्क्युलेटेड नव्हते. प्रत्येक गोष्टीचा राजकीय विचार करणारे ते नव्हते. त्यांच्या मनात कपटनीती नव्हती. राज यांचे असेच आहे. कालच्या सभेत त्यांनी सांगितले की, माझ्या मित्राच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे. मला तिथे गेले पाहिजे. अर्थात त्या मुलाला याची कल्पना नाही!… राज यांच्या मैत्री जपण्याच्या वृत्तीचा अनेकजण कौतुकाने उल्लेख करत असतात. मला वाटते, या छोट्याशा गोष्टीतून याचा पुन्हा प्रत्यय आला. उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत. आदित्य हे कवी आहेत. अमित हे उत्कृष्ट पियानो वाजवतात आणि ते वाद्यसंगीताचे भोक्ते आहेत. बाळासाहेब हे व्यंगचित्रकार. प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार आणि लेखक. त्याचप्रमाणे ते इतिहास संशोधक, नाटककार आणि उत्तम वक्ते होते. ‘श्यामची आई’ या चित्रपटात प्रबोधनकारांनी प्रवचनकाराची भूमिका केली होती आणि ‘महात्मा फुले’ या चित्रपटात सनातनी ब्राह्मणाची. असो.उगाचच कोणाच्याही आरत्या ओवाळणे हा माझा स्वभाव नाही. पण हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, शिवसेना आणि मनसे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि धुरिणांनी आपापल्या पक्षाची खरी ताकद कशात आहे हे ओळखून, ती अधिक वाढवल्यास, त्याद्वारे महाराष्ट्रहित साधणे शक्य होऊ शकेल. शिवसेना व मनसेकडे फारशी साधनसामग्री नसेल, सत्ता नसल्यामुळे कार्यकर्ते कमी असतील,

परंतु या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी ‘भावनिक बँक’ (बँक ऑफ इमोशन्स) आहे, ती मात्र अजोड आहे. नकली शिवसेनेकडे ठेके आहेत, समृद्धी आहे, म्हाडा, नगरविकास, एमएसआरडीसी, एमएमआरडी, सिडको वगैरे सर्व काही आहे. पण दुसऱ्या बाजूला उद्धव यांची शिवसेना आणि राज यांची मनसे यांच्याकडे बाळासाहेबांचा अस्सल वारसा आहे. सलीम-जावेद यांच्या ‘दीवार”मधील ‘मेरे पास माँ है!’ या गोष्टीची आठवण व्हावी, अशीच ही बाब आहे.कोणत्याही पक्षात स्पर्धा असते, परंतु शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दलची कमालीची निष्ठा दिसते. त्याचप्रमाणे शिवसैनिक व मनसैनिक यांच्यात परस्परांबद्दल जिव्हाळा दिसतो. मला या दोन पक्षांचे अनेक फाटके कार्यकर्ते भेटतात. काल षण्मुखानंदबाहेर देखील एक ज्येष्ठ शिवसैनिक दिसले, जे अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या सेलचे काम करतात. ही अशी प्रामाणिक, समर्पित कष्टकरी माणसे-सैनिक हेच या दोन्ही पक्षांचे खरे बळ आहे. हे त्यांचे लॉन्ग टर्म डिपॉझिटच आहे. या फाटक्या शिवसैनिक व मनसैनिकांत एकमेकांबद्दलची आस्था व जिव्हाळा आहे. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये देखील एकमेकांबद्दल आदरभावना आहे. उद्धव आणि राज यांच्यात मतभेद असताना देखील एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चुकून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याबद्दल वावगा शब्द उच्चारला, तरी त्याच पक्षाचा दुसरा कार्यकर्ता त्याला फटकारत असे. म्हणजे उद्धवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याने राज यांच्यावर टीका केली,

तर ती उद्धवसेनेच्या दुसऱ्या कार्यकर्त्याला रुचत नसे. त्याचप्रमाणे एखाद्या मनसैनिकाने उद्धवजींवर टीका केल्यास, मनसेमधील दुसऱ्या कार्यकर्त्यास हे अजिबात आवडत नसे, हे मी स्वतः पाहिले आहे. त्यामुळे शिवसेना व मनसेमधील ही मर्मबंधातली ठेव कधीच संपणार नाही… अर्थात ही अमोल ठेव जवळ असल्यामुळे उद्धवजी आणि राज यांच्यावरील जबाबदारी देखील वाढली आहे. आपापल्या पक्षातील व स्वतःच्या नेतृत्वामधील त्रुटी त्यांना दूर कराव्या लागतील. असो. बाळासाहेबांच्या केवळ आठवणीने गहिवरणारे बाळा नांदगावकर, हे आपण सर्वांनी पाहिलेच आहेत.. पण भावनांचे व एकनिष्ठतेचे भांडवल असले, तरी प्रत्यक्ष राजकारण करताना मात्र ते जनहिताच्या मुद्द्यांचेच करावे लागेल. आणि असा मुद्दा काल उद्धवजींनी रोजगार कौशल्य, विकास व व्यवसाय मार्गदर्शनाबद्दलचा नवीन उपक्रम लॉन्च करून हाती घेतला आहे. राज ठाकरे यांनी देखील अनेक वर्षांपूर्वी ‘जिगर 2000’ हा उपक्रम हाती घेतला होता. माझ्या आठवणीप्रमाणे नागपूरमध्ये त्यांनी बेरोजगारांचा विक्रमी मोर्चा देखील काढला होता. ‘शिव उद्योगसेना’ देखील काढली होती. दुसरा मुद्दा आहे, तो आणखी वेगळा. एखादा नॉर्मल माणूस राजकारणात पडतो आणि तो ज्या प्रकारचे राजकारण नेता म्हणून करतो, ते एका विशिष्ट पद्धतीचेच असते. परंतु जेव्हा बाळासाहेब, उद्धवजी अथवा राज ठाकरे यांच्यासारख्या कलाकार राजकारणात उतरतो, तेव्हा तो कधीच प्रेडिक्टेबल राजकारण करत नाही. समाजवादी किंवा कम्युनिस्ट नेते राजकारण तार्किक अथवा बुद्धिनिष्ठ स्वरूपाचे करतात. शिवसेना किंवा मनसेचे राजकारण चर्चा करण्याचे नाही, तर थेट कृती करण्याचे किंवा खोपच्यात घेण्याचे अथवा ‘चौरंग’ करण्याचे आहे! ठाकरे कुटुंबाचे राजकारण हे वेगळेच आहे. कारण हे कुटुंब कलाकारांचे आहे. कुमार गंधर्व अथवा भीमसेन कशाप्रकारचा आलाप वा तान केव्हा घेतील, याचा आपण पटकन अंदाज बांधू शकत नव्हतो. हे काहीतरी अद्भुत स्वरविश्व साकारत असत. किशोरकुमारचा गाण्यांचा स्टेजवरचा प्रत्यक्ष कार्यक्रम मी पाहिला आहे. तो कुठल्याही करामती अचानकपणे करत असे. गायक म्हणून मोहम्मद रफी हा अधिक तयारीचा होता व तो शास्त्रीय संगीत शिकलेला होता. किशोरकुमारने गायन शिक्षण घेतलेले नव्हते. पण तरी तो काय भन्नाट गायचा! अनेक नटांना तो आवाज द्यायचा, तेव्हा तो त्या नटांचाच आवाज वाटायचा.

किशोर नव्हे, तर राजेश खन्ना किंवा देव आनंदच गात आहेत असे आपल्याला वाटे! किशोर काही जणांना विक्षिप्त वाटायचा. तो गमती करायचा, खेचायचा. पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना आपल्या एखाद्या कृतीने धडा शिकवायचा. मला असे वाटते की, राजकारणातली निव्वळ चलाखी, स्ट्रॅटेजी, बंडलबाजी, ढोंगबाजी हे सारे बाळासाहेबांना कधी जमलेच नाही. पोटात एक आणि ओठात एक हा राजकारणाचीतील नागपुरी गुण मातोश्री अथवा ‘शिवतीर्थ’मध्ये नाही. कारण ठाकरे फॅमिली ही कपटी, हिशेबी माणसे नाहीत. ती तोंडावर शिव्या घालतील. पण तुमच्या नकळत तुमच्यावर प्रेम करतील. मैत्रीसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काहीही करतील! ही ठाकरे फॅमिली फक्त ठाकरेंपुरती मर्यादित नाही. अशा प्रकारचे ‘ठाकरे’ सामान्य शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मी अनेकदा पाहिले आहेत. या सर्वांचे मिळून हे एक ठाकरे कुटुंब आहे. ते महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि परदेशांतही पसरलेले आहे. आणि शेवटी दिलदार व बेहिशेबी माणसेच इतिहास घडवत असतात!

Views: 72
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
२४ जानेवारी १९५०: डॉ राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती पदावर निवड !

२४ जानेवारी १९५०: डॉ राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती पदावर निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)