ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मा. राज ठाकरे यांच्याबद्दल परखड विचार/मनोगत व अपेक्षा !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.राज ठाकरे आपल्या भाषणात ज्या कोट्या करतात किंवा युक्तिवाद करतात ते किती अतार्किक असतात याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांच्या भाषणातील कोट्या फक्त टाळ्या आणि विनोद निर्माण करणारे असतात.
आता हेच पहा ना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी महोत्सव षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा झाला. त्यावेळेस राज ठाकरे भाषण करत होते. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या भाषणात त्यांच्या तब्येतीविषयी माहिती देताना सांगितली की माझे फॅमिली डॉक्टर ‘यादव’ आहेत… पुढे बोलताना ते म्हणाले ‘मराठी यादव’ बर का?.. ठीक आहे असतीलही… त्यांना त्यांच्या मराठी ‘यादवां’ नी जी औषधे दिली ती मराठी यादवांनीच बनवलेली आहेत का?
राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’चे काम तर त्यांनी ‘हिंदी यादवां’ कडे सुपूर्द केले होते. त्यावेळी त्यांना मराठी यादव इंजिनियर मिळाला नाही का? त्यातील बरेचसे इंजिनियर नॉर्थ इंडियन होतेराज ठाकरे आपली ‘लक्झरी लाईफ’ जगताना ज्या वस्तू वापरतात त्या तर ‘हिंदी यादवां’च्या सुद्धा नाहीत. त्या ‘इंग्लिश यादवां’च्या अर्थात परदेशी आहेतराज ठाकरे यांच्याकडे जी कुत्री आहेत ती सुद्धा ‘इंग्लिश यादव कुलीन’ आहेत. कुत्री पाळण्याचा शौक असावा. त्याबद्दल दुमत नाही फक्त आपल्या माहितीस्तव सांगितलं. राज ठाकरे यांची बरीचशी उद्योगपती मित्र हे ‘हिंदी यादव’ कुळातील आहेतराज ठाकरे यांना मागे काही दिवसापूर्वी टेनिस खेळत असताना हाताला दुखापत झाली होती.
त्यावेळी ती बरी करण्यासाठी त्यांना ‘हिंदी यादवां’कडे जावे लागले होते. राज ठाकरे यांचा मुलगा शिकलेल्या शाळा या ‘हिंदी यादवां’ च्या सुध्दा नाहीत. त्या तर ‘इंग्लिश यादव कुळा’तील आहेत.राज ठाकरे यांच्या घरातील इंटेरियल आणि एक्स्टेरियल हे काही हिंदी आणि काही बाहेर देशातील तज्ञांनी डिझाईन केलेले आहे. राज ठाकरे यांच्या घराच्या आसपास असणारे बरेचसे सिक्युरिटी गार्ड्स हे परप्रांतीय आहेत अर्थात ‘हिंदी यादव’ आहेत. राज ठाकरे यांचे बरेचसे रिलेटिव्हज हे बाहेर देशातील विद्यापीठांमध्ये शिकलेले आहेत.
अर्थात हिंदीसुद्धा नाही तर ‘इंग्लिश यादवां’ च्या शाळेत शिकलेली आहेत. राज ठाकरे यांचे अनेक जवळचे उद्योगपती मित्र हे ‘गुजराती यादव’ आहेत. हे सर्वांना माहिती आहे. ‘वोट बँके’साठी मराठी मराठी करायचं आणि लोकांना वेडं बनवायचं. पैशाच्या बळावर हिंदी (नॉन मराठी) किंवा फॉरेनर लोकांनी राज ठाकरेंच्या आसपास प्राईम लोकेशनला जागा, बिल्डिंग खरेदी केली तर भारताच्या फेडरल सिस्टीममध्ये राज ठाकरे त्यांना अडवणार आहेत का? आजार एक आणि औषध दुसरे देऊन उपयोग नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी प्रथम मराठी माणसाला स्वावलंबी कसं बनवता येईल यावर फोकस करावा. विनोदी आणि अतार्किक भाषणं करण्यापेक्षा मराठी माणसाला फायनान्शिअल स्टॅबिलिटी कशी प्राप्त होईल यावर मोटिवेशनल स्पीकरसारखी भाषणं दिली तर अधिक चांगलं होईल. मराठी माणूस खरं तर फार स्ट्रॉंग आहे, फक्त या राजकारणी लोकांनी त्याला वेडं बनवून पेढा खाल्ला आहे. टिन एज मधील मुलांना तसेच 18 ते 24 या एज मधील मुलांना प्रक्षोभक आणि भडकाऊ भाषणं देऊन गेल्या 10 वर्षांपूर्वी गेल्या राज ठाकरेंनी अनेक तरुणांचे भविष्य उध्वस्त केले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कारण त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक तरुण मुलांवर वेगवेगळ्या केसेस दाखल झालेल्या असून त्या अजूनही वेगवेगळ्या कोर्टामध्ये चालू आहेत. ना त्या मुलांना कुठल्या नोकऱ्या मिळत आहे. .ना कुठला काम धंदा. अशावेळी त्या गोरगरीब मुलांच्या घरी राज ठाकरे कधी गेलेत का? कधी त्यांची विचारपूस केली का? कधी राज ठाकरे यांच्या आमदारांनी याबाबतीत विधानसभेत प्रश्न मांडला आहे का? अशा बातम्या कधी आल्यात का? राज ठाकरे कधी उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत का? राज ठाकरे यांनी कधी एमपीएससीच्या MPSC मुलांचे प्रश्न मांडलेत का? ते तिकडे शरद पवार साहेब या वयात पण शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत.
राज ठाकरे साहेब निवडणुका झाल्या ती पाच वर्षे गायब होतात. त्यांना आलिशान, लक्झरी, लांबलचक, इम्पोर्टेड कार्समधून बाहेर पडल्यानंतर सर्दी खोकला होते. राज्यभरात एक दोन सभा घ्यायच्या आणि लोकांना वेडं बनवायचं.आपल्या गळ्यातील भली मोठी घोंगडी सावरत ‘कोणत्या भोकात कोणती सोंगडी’ करत बसण्यापेक्षा आणि बेरोजगार तरुणांना वाम मार्गाला लावण्यापेक्षा काम मार्गाला लावलं असतं तर आपले आज पाच पन्नास आमदार आणि पाच 50 नगरसेवक सहज निवडून आले असते.
घरातील बाहीखरंच जर राज ठाकरे यांना मराठी प्रेम असेल तर त्यांनी मराठी तरुणांच्या हाताला काम धंदा मिळेल किंवा ते स्वावलंबी होतील आणि फायनान्शिअल स्टॅबिलिटी प्राप्त होईल. त्यातून मुंबईसारख्या शहरात प्राईम लोकेशनला घर घेऊ शकतील इतके सक्षम करावे तरच ते खरे मराठीप्रेमी आहेत असं म्हणता येईल. भाषणात विनोद, आणि अतार्किक कोट्या करून लोकांना हसवण्यापेक्षा हे अधिक उत्तम राहील.


