मायणी गटात शिट्टी अन् तुतारी वाजणार का, माघार घेणार?
अपक्ष पांडुरंग झगडे व श.प.राष्ट्रवादीचे अँड.प्रल्हाद सावंत यांचेकडे लक्ष.
मायणी प्रतिनिधी
जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज दिनांक २७ रोजी दुपारी तीन वाजे पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. सर्वत्र बंडखोरी रोखण्यासाठी आणि मतांच्या बेरीज वजाबाकी राजकारणाची परस्थिती पाहता आज तीन वाजेपर्यंत सर्वत्र अंतिम उमेदवारी कोणाची राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मायणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मायणी गटात शेखर भाऊ गोरेंचे कट्टर समर्थक पांडुरंग झगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्वप्रथम दोन्ही गोरेंच्या एकत्र विचाराने भाजपा पक्षाकडून अँड.सूरज पाटील व पांडुरंग झगडे यांच्यापैकी एक मायणी गटाची उमेदवारी होईल असा कयास मांडला जात होता.
परंतु अर्ज भरण्याच्या अखेर पर्यंत उमेदवारी निर्णय झाला नसल्याने पांडुरंग झगडे यांनी शेखर गोरे गटाच्या वतीने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळे भाजपा गोटात या उमेदवारीची चर्चा झाली. ओबीसी विरुद्ध ओबीसी अशा लढतीची कयास मांडला जात असताना. भाजपा कडून कुणबी तून अँड. सूरज पाटील याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गटात सर्वत्र व्यापारी म्हणून संपर्क असणाऱ्या आणि शेखर गोरंचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या पांडुरंग झगडे यांनी अर्ज माघारी घेतला नाही तर त्यांना पडणाऱ्या मतांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
या मतविभाजनाचा विचार करता मायणी गटासाठी डॉ. येळगावकर यांच्याकडून पांडुरंग झगडे यांच्या उमेदवारी अर्जाची माघार होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परतू पांडुरंग झगडे हे शेखर गोरे यांच्या आदेशाच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.
याचबरोबर उमेदवारीच्या चर्चेत प्रस्थापितांकडून स्वाभिमान दुखावला गेला असल्याने थेट शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून गटाच्या उमेदवारीचे शिवधनुष्य हाती घेतलेले अँड. पी.डी सावंत यांच्या समर्थनात मायणी गावातील तिसरा गट तसेच गटातील शरद पवार प्रेमी सरसावले असल्याने त्यांच्या उमेदवारीतून होणाऱ्या मतविभाजनाचा फटका राष्ट्रवादी पक्ष अजित पवार पक्षास बसणार! का राष्ट्रवादी सह भाजपा या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना होणार हे सावंत यांच्या उमेदवारीतून स्पष्ट होईल.
राज्यात सर्वत्र दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन भाजपा विरोध लढताना दिसत आहेत . परतू मायणी गटातील अँड सावंत शरद पवार राष्ट्रवादी गटातून लढण्यासाठी आतापर्यंत ठाम आहेत. सध्या ते नॉट रिचेबल असल्याने वरिष्ठ पातळीवर चर्चेसाठी मायणीतून धाव घेतली गेली असून याबाबत तुतारीचा हा उमेदवार आपला पक्षाचा अर्ज माघारी घेणार ! का?थेट निवडून लढवणार. याची प्रतीक्षा थोडाच वेळात संपेल.
मायणी गटाची जिल्हा परिषद निवडून तिरंगी का चौरंगी होणार हे आता आजच्या दिवशी दुपारी 3 नंतर स्पष्ट होईल.


