ब्रेकिंग न्युज
भाजपच्या प्रचारसभेत सेना उमेदवारच्या गाडीचा स्पीकर लावल्याने संतप्त जमावाने गाडीच फोडली
माणगंगा न्युज
विभूतवाडी ता.आटपाडी येथे भाजप व सेना उमेदवारांचे प्रचार सुरू होते गावातून पदयात्रा काढली होती त्यानंतर भाजपचे उमेदवार माधवी पडळकर यांची बसस्थानकाच्या शेजारी चिंचेच्या झाडाखाली सभा सुरू होती. सभा सुरू असताना भाजपचे उमेदवार माधवी पडळकर यांची सभा सुरू होती या सभेमध्ये माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर मार्गदर्शन करीत होते परंतु समोरच शंभर फुटावर डांबरी रस्त्यावरती शिवसेना पक्षाचे स्पीकर लावून प्रचार करणारे छोटा हत्ती सभेपासून जवळपास शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावर कराड पंढरपूर रस्त्यावर उभा केला होता.तर पक्षाच्या प्रचारार्थ स्पीकर सुरू होता तो स्पीकर सुरू असल्याने भाजपच्या प्रचार सभेमध्ये नेत्यांची भाषणे मतदारांना ऐकू येत नव्हती त्यामुळे गावातीलच काही नागरिकांनी त्या छोटा हत्ती च्या ड्रायव्हरला सांगितले की सभा संपल्यानंतर तुझा स्पीकर चालू कर नसेल तर गाडी पुढील साईटला नेऊन उभा करवी.परंतु असे सांगून सुद्धा गाडीचा ड्रायव्हर ऐकून घेत नव्हता आणि त्या छोटा हत्ती वरील स्पीकर मुळे भाजपच्या प्रचार सभेत व्यक्ती येत होता त्यामुळे अनेक नागरिकांनी सांगून सुद्धा ड्रायव्हर ने गाडी हलवली नाही व स्पीकर चा आवाज ही बंद केला नाही म्हणून संतप्त जमावने गाडीवर हल्ला केला व त्यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या. तर जे नागरिक त्या ड्रायव्हरला समजावून सांगण्यासाठी गेले होते त्यांचेही त्या ड्रायव्हरने ऐकले नाही व स्पीकर चा आवाज कमी केला नाही किंवा स्पीकर बंद केला नाही म्हणून हा प्रकार घडला असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी नागरिकांनी सांगितले.


