विभूतवाडीची लेक तर घरनिकीची सून अहिल्या पुकळे, तर कुरुंदवाडी आजोळ असणाऱ्या ॲड .विद्या मोटे यांना प्रचारात वाढता पाठिंबा..
घरनिकी पंचायत समिती गणातून विभूतवाडी गावची लेक तर घरनीकी गावची सून अहिल्या शरद पुकळे (माहेरचे नाव) घरनिकी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवीत आहेत. तर निंबवडे जिल्हा परिषद गटातून उच्च शिक्षित एडवोकेट विद्या मोटे ह्या निवडणूक लढवीत आहेत.तसा विचार केला तर या दोन्हीही उमेदवारांच्या पाठीमागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. अनेक ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये राजकीय पार्श्वभूमी असते अशा घरातील किंवा नातेवाईकच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात .परंतु निंबवडे जिल्हा परिषद गटांमध्ये विद्या मोटे व अहिल्या पुकळे यांच्या पाठीमागे कोणताही राजकीय इतिहास नाही.

सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली अहिल्या यांना कोणताही राजकीय वारसा नाही तर जिल्हा परिषदेच्या उमेदवार विद्या मोटे यांनाही कोणता राजकीय वारसा नाही. दोघीनाही राजकीय वारसा नसताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोघीही उतरल्या आहेत.जिल्हा परिषद च्या उमेदवार विद्या मोटे यांचे सासर विभूतवाडी असले तरी त्यांचे आजोळ कुरुंदवाडी आहे. कुरुंदवाडी हे आटपाडी तालुक्यातच येते नव्हे तर विभुतवाडी व कुरुंदवाडी गावामध्ये फक्त सरहद्द आहे.घरनीकी पंचायत समितीला उभा असणाऱ्या अहिल्या पुकळे मेटकरी ह्या ही राजकारणामध्ये नवक्याच आहेत. तर जिल्हा परिषद च्या उमेदवार विद्या मोटे राजकारणामध्ये नवक्याचा आहेत.

अहिल्या पुकळे मेटकरी यांचे वडील समाज कार्यामध्ये सक्रिय असतात. परंतु सासरी पती-सासरे यांना कोणालाही राजकारणाचा छंदही नाही अशा नवख्या उमेदवार आहेत.जिल्हा परिषद च्या उमेदवार विद्या मोटे व घरनीकी पंचायत समितीच्या उमेदवार अहिल्या पुकळे मेटकरी यांनी गाव अन् गाव, घर अन् घर पिंजून काढले आहे प्रचारामध्ये गती घेतली आहे. अनेक ठिकाणी हळदीकुंकू समारंभाचे कार्यक्रम होत आहेत. यामधून संवाद साधला जात आहे. आणि तसा विचार केला तर घरनिकी गावचे मतदान ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रचाराच्या बाबतीत विचार केला असता विद्या मोटे व आहिल्या पुकळे मेटकरी यांनी वस्ती असेल गावातील घरे असतील महिलांच्या गाठीभेटी घेणे महिलांशी संवाद साधने अशा प्रकाराचे उपक्रम राबवले आहेत.
रानावनात काट्याकुट्यातून मार्ग काढत ,वाडी वस्तीला राहणाऱ्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेऊन उमेदवारांनी आपली भूमिका काय आहे हे सर्वांना सांगितले आहे. भविष्यात करणारी कामे सांगत आहेत व आतापर्यंत केलेल्या कामाचा नागरिकांना उजाळा देत आहेत. यामुळे त्यांच्या प्रचाराला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावात वाड्यावरत चांगल्या पद्धतीचा त्यांना प्रतिसाद मिळून येत आहे. आणि अनेक नागरिकांच्या महिलांच्या अडचणी सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे या दोघींनाही मतदारातून पसंती वाढली आहे.


