• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शेवटी देवाक काळजी !ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
February 10, 2026
in Uncategorized
0
शेवटी देवाक काळजी !ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

शेवटी देवाक काळजी !ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.मालवणी माणसं श्रद्धाळू असतात परंतु अंधश्रद्ध नसतात. त्यामुळेच मालवणी माणूस “देवाक काळजी” म्हणून निर्धास्त असतो. कोंकणातील देव देवता जागृत देव म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या ग्रामदेवताही जागृत असतात.

त्यामुळे कोकणी माणसं उदरनिर्वाहासाठी जरी मुंबई पुण्यात आले तरी गावची जत्रा कधीच चुकवत नाहीत. नवस करणे, गाऱ्हाने घालणे व ते फेडणे हा मालवणी माणसाचा नित्यक्रम असतो.मी अंधश्रद्ध नाही परंतू श्रद्धावान आहे.म्हणून माझ्या तोंडी “देवाक काळजी” हे वाक्य सतत असते. तीन दिवसापूर्वी माझ्यावर जो भेकड हल्ला झाला, त्या प्राणघातक हल्ल्यातून मी बचावलो. भरपूर मुका मार लागला व खांद्याचे हाडाला फ्रॅक्चर झाले. त्यानंतर पोलीस तपास कासवगतीने सुरू आहे. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचा एक सेटिंगबाज पोलीस या प्रकरणात सेटिंग करीत आहे. राजकीय दबाव देखील आहे. पोलीस, न्यायालये अविश्वसनीय झाली आहेत. त्यामुळे न्याय मिळेलच, याची खात्री देता येत नाही.माझा माझ्या देवतांवर विश्वास आहे.

त्यामुळे यापूर्वी माझ्यावरील दोन प्राणघातक हल्ल्यातून सुखरूप बचावलो. या वेळी मात्र माझा घात झाला व मला एकाकी व बेसावध गाठून हा हल्ला झाला. तिसेक वर्षांपूर्वी दोन दारुड्याचे भांडण सोडवताना त्या दोघांनी मिळून मला मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी थातूरमातुर दंड लावून त्यांना सोडून दिले होते

. मात्र नियतीला हा न्याय मंजूर नव्हता. काही महिन्यातच त्या दोन दारुड्या पैकी एकाला त्याच्या पत्नीने जाळून मारले होते तर दुसऱ्याचा मुलगा पाण्याच्या टाकीत बुडून मेला. उगाच त्या निष्पाप बालकाचा जीव गेला. माझ्या निवडणुकीच्या वेळी माझ्यावर काळी करणी करून पराभूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे आई बाप बहीण व मेव्हणाही वारला. एक गुंड कुत्र्याच्या मौतीने भरदिवसा मारला गेला. हा नियतीचा न्याय आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत. म्हणून माझ्या पाठीशी पोलीस, न्यायदेवता जरी उभी राहिली नाही तरी माझ्यावरील हल्लेखोर व त्यांचे सूत्रधार यांना नियतीच क्रूर शिक्षा देईल, याची मला खात्री आहे. मी नेहमी सत्याची पाठराखण करीत आलो आहे,

म्हणूनच परमेश्वर माझे नेहमी रक्षण करतो. एकदा तर सात आठ सशस्त्र मारेकरी मला ठार मारण्यासाठी आले होते, परंतू माझ्या प्रसंगावधाणामुळे व धैर्यामुळे मी वाचलो. त्यांना हात हालवत परत जावे लागले. त्यांच्या सूत्रधार भाईला MPDA खाली तुरुंगावास पत्करावा लागला होता.*येत्या तीन महिन्याच्या आत माझ्यावरील हल्ल्यातील सूत्रधारांचे वाटोळे झाले नाही तर मी माझ्या देवतांचे नाव घेणार नाही

.* हा शाप नाही. एका प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यावर, एका निष्पक्ष व निर्भीड पत्रकारावर भाडोत्री गुंडा मार्फत भ्याड हल्ला करणाऱ्यावर नियती घाला घातल्याशिवाय राहणार नाही. माझ्या आप्तस्वकीय व चाहत्यांचा तळतळात त्यांना भोवल्या शिवाय राहणार नाही. *या पुढे नियतीमुळे त्यांचे जे भोग सुरू होतील, ते सर्वांना कळतीलच.शेवटी देवाक काळजी !

Views: 65
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
*त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प*५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण*

*त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प*५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)