• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

*त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प*५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण*

माणगंगा by माणगंगा
February 11, 2026
in Uncategorized
0
*त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प*५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण*

*त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प*५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण*

चिपळूण/ खेड (प्रतिनिधी- वार्ताहर)**ग्रामीण भागातील अनामिकांच्या चिट्ठ्यातून उलगडले किशोरवयींचे भावविश्व; निमित्त होते, कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि दिशान्तर संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भया’ हा विशेष उपक्रमाचे!*

*या प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील तीन प्रमुख शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.**जागतिक संकल्पनेतला उपक्रम*यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) जागतिक महिला दिनानिमित्त मासिक पाळी आरोग्य आणि जागृतीवर विशेष भर दिला आहे. याच जागतिक संकल्पनेला अनुसरून ‘निर्भया’ प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. ‘मासिक पाळी आरोग्य जागृती, सन्मान आणि समता सशक्तिकरण’ हे या प्रकल्पाचे मुख्य सूत्र होते.

*तीन विद्यालये ५०० विद्यार्थिनी*खेड तालुक्यातील यशवंत विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय धामणंद, न्यू इंग्लिश स्कूल आंबडस आणि चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) या तीन विद्यालयांमध्ये या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या शाळांतील ५०० विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. *डॉक्टरांचे मार्गदर्शन* प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा कुलकर्णी-उत्पात (BAMS, MA, MSc) यांनी अत्यंत ओघवत्या आणि संवेदनशील वृत्तीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया कशी आहे, या काळात आहार, व्यायाम आणि स्वच्छता कशी राखावी, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उत्तरार्धात मुलींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. अपर्णा यांनी शास्त्रीय उत्तरे देऊन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले.*

आरोग्य संच व पुस्तिका*केवळ मार्गदर्शनच नव्हे तर मुलींना प्रत्यक्ष मदत मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीला ‘निर्भया’ मार्गदर्शक पुस्तिका देण्यात आली. या पुस्तिकेत मासिक पाळी दरम्यान पाळावयाची पथ्ये आणि स्वच्छतेबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच, पर्यावरणाचे रक्षण आणि दीर्घकालीन वापरासाठी उपयुक्त असे ‘रियूजेबल सॅनिटरी पॅड्स’ (पुन्हा वापरण्यायोग्य सॅनिटरी पॅड) देखील सर्व विद्यार्थिनींना वितरित करण्यात आले.*नेरोलॅक चे सामाजिक उत्तरदायित्व* कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे सामाजिक उत्तरदायित्व (CSR) आणि दिशान्तर संस्थेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड या कंपनीच्या असोसिएट ऑफिसर ह्युमन रिसोर्स प्राजक्ता पाटील तसेच अनिशा निकम व सेजल बेलोसे तर दिशान्तर संस्थेतर्फे अध्यक्ष श्री. राजेश जोष्टे, सचिव सौ. सीमा यादव यांची उपस्थिती होती. कार्यक्रम मार्गदर्शन व सहकार्य कंपनीचे सीएसआर प्रमुख श्री संतोष देशमुख व यशस्वीतेसाठी लोटे प्लांट चे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक नंदन सुर्वे यांचे योगदान राहिले. विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी झाला. (चौकट घेणे)*…

त्या अनामिका!*सहभागी विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्य विषयक तसेच मासिक पाळी विषयक शंका- समस्या यांची एक अगदी छोटी चिट्टी लिहावयास सांगण्यात आली होती. यात त्या विद्यार्थिनीची कुठेही ओळख दिसता नये याची काळजी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या दोन दिवसपूर्वी या चिठ्ठ्या एकत्र करण्यात आल्या. त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून आरोग्य विषयक शंका -समस्यांचा उलगडा होण्यास मोठीच मदत झाली.

Views: 40
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
त-हाडी शाळेच्या आवारातील जीर्ण इमारत देत आहे अपघातास निमंत्रण.

त-हाडी शाळेच्या आवारातील जीर्ण इमारत देत आहे अपघातास निमंत्रण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)