त-हाडी शाळेच्या आवारातील जीर्ण इमारत देत आहे अपघातास निमंत्रण.
.त-हाडी – प्रतिनीधी
त-हाडी ता. शिरपूर : येथून जवळच असलेल्या त-हाडी जिल्हा. परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात ३५ वर्ष जुनी शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आली आहे. या इमारत मुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. जीर्ण इमारत पाडण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त-हाडी शाळेच्या आवारात असलेल्या या इमारतीत जुना वर्ग होते. हि इमारत गेल्या अनेक वर्षांपासून ओस पडल्याने पडण्याच्या अवस्थेत आली आहे.
इमारत ओस पडल्यामुळे या इमारतीला तडे पडले आहेत. इमारतीचा पाया खालून कोरला जात असल्यामुळे हि इमारत केव्हा कोसळेल याचा नेम नाही. या इमारतीला लागून शाळा खोल्या आहेत. या इमारतीतून सर्प, विंचू, उंदीर असे प्राणी वेळोवेळी निघत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असते. हि जीर्ण इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या जीर्ण इमारत त्वरित पाडावी व होणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
प्रतिक्रिया
हि इमारत ३५ वर्ष जुनी आहे. व शाळेच्या आवारात असल्यामुळे विद्यार्थी या इमारतीच्या आजूबाजूला वावरत व खेळत असतात. अनेक वेळा या इमारतीतून सर्प, विंचू निघतात इमारतीचा पाया कोरला जात असल्यामुळे आम्ही शाळेतर्फे ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना या जीर्ण इमारत पाडण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे.
अशोक बडगुजर
मुख्याध्यापक त-हाडी ता. शिरपूर
प्रतिक्रिया
शाळेच्या आवारात असलेली वर्ग खोली जीर्ण इमारत पडण्याच्या अवस्थेत आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही वरिष्ठांना या विषयी ग्रामपंचायत ठराव दिला आहे. लवकरच हि जीर्ण इमारत पडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
देविदास धांडे
ग्रामविकास अधिकारी त-हाडी


