ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर
यांचे मनोगत !!
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर
यांचे मनोगत !!
ही शायरी जे माझ्यावरील हल्यानंतर मौन बाळगून आहेत व औपचारिक चौकशीही केली नाही त्यांच्यासाठी आहे
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर
यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
माझ्यावरील घातपाती भ्याड हल्ला हा अनपेक्षित होता. माझ्या 46 वर्षाच्या पत्रकारितेत कोणी माझ्यावर हात उचलण्याचे धाडस केले नव्हते. निवडणूक काळात मी लिहिलेल्या वस्तूनिष्ठ लेखनाने ज्यांची अढळ समजली जाणारी आसने डळमळीत झाली त्याचेच हे काम आहे. यापूर्वी त्यांनी अनेकांवर हल्ले केले आहेत. पण हा हल्ला त्यांचा शंभरावा अपराध ठरणार आहे. राजकारणात सामंजस्याने प्रश्न वा वाद सोडवता येतात. मी नेहमीच त्याबाबत सकारात्मक होतो. परंतू सत्ता, मत्ता व माज आलेले हे लोक पोलीस, न्याय व जनतेलाही भीत नाहीत.
माझ्यावर भ्याड हल्ला केला, म्हणजे मी माझी लेखणी म्यान करेन हा त्यांचा गोड गैरसमज असावा. पोषण आहारात पेरलेली उंदराची लेंडी किती कोटीत पडली ? हे त्या लेंडीबाजाना चांगले ठाऊक आहे. हा तर माझ्यावरील क्रूर हल्ला आहे, त्याची किंमत ते कशी चुकवणार? हे लवकरच दिसेल. मी कायद्याने चालणारा व कायदा मानणारा व्यक्ती आहे. त्यांना कायद्याने जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. कदाचित शिक्षा होणारही नाही. परंतू नियतीच्या दरबारात न्यायनिवाडा होतोच होतो. कारण नियती कधीच लाच खात नाही. यापूर्वीच्या लेखात मी नियतीने कोणावर कधी व कसा सूड उगवला? हे सविस्तर लिहिले आहे.
माझ्यावर पक्षांतर्गत राजकारण करून मला ज्यांनी डावलले, अपमानस्पद वागणूक दिली, त्यांना आज दारावरील कुत्र्यासारखी वागणूक मिळत आहे. जे मला संपवायला निघाले होते त्यांना त्यांच्या कर्माने आधीच संपवले, उरलेले काम माझ्या धारदार लेखणीने केले आहे.
राजकारणात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन भिक्षाणंदेही करीत जोगवा मागत ते फिरत आहेत. ही त्यांच्या विनाशाची सुरुवात आहे. कारण त्यांनी एका निष्पक्ष पत्रकारावर व निष्ठावंत कार्यकर्त्यावर भेकड हल्ला केला आहे. त्याची किंमत नियती दसपटीने वसुल करेल. कर्माचे भोग भोगावे लागतील. हा अंध आशावाद नाही. तर नियतीवरील ध्रुढ आत्मविश्वास आहे. येत्या तीन महिन्यात ही भविष्यवाणी खरी झाली नाही तर मी माझ्या दैवतांचे नाव घेणार नाही.
माझ्यावरील हल्यानंतर शेकडो हितचिंतक, मान्यवर मला भेटण्यासाठी आले. मात्र अनेकांनी भेटणे सोडा फोनवरही विचारपूस केली नाही. जे अश्यावेळी माणुसकीला जागले नाहीत त्यांची नियत कशी आहे ? ते त्यांनी कृतीने दाखवून दिले. माझा कोणावरही रागलोभ नाही. फक्त हल्लेखोर पकडले जावेत व त्यांचे खरे सूत्रधार जगासमोर यावेत, हीच अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सांगतो माझा माझ्या ईश्वरी शक्तीवर विश्वास आहे, त्याला कधीच तडा जाणार नाही. त्या घातक्यांचे count down सुरू झाले आहे.


