दहावी बोर्ड परीक्षेत सुयश मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढवावा – डॉ. दिलीपराव येळगावकर अनंत इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थी शुभचिंतन व सन्मान सोहळा संपन्न
मायणी….प्रतिनिधी
स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनंत इंग्लिश स्कूल मायणीच्या उभारणीसाठी आजवर अनेक वर्षांचा संघर्ष करीत कोर्टाच्या पायऱ्या चढून , प्रस्थापितांच्या षड्यंत्रणा बाजूला करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. आज ही संस्था संचालक मंडळ,शिक्षक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना घडवण्याचे कष्ट घेतल्याने सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.
येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेत शाळेच्या सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनींनी सुयश मिळवून या संस्थेचा नावलौकिक वाढवावा ,असे आवाहन स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ .दिलीपरावजी येळगांवकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
ते विद्यालयामध्ये इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उर्मिला येळगावकर,नूतन जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील, पंचायत समिती सदस्या सौ.अनिता कोळी व कलेढोणगण सदस्य राजुशेठ जुगदर ,विजयराव कवडे, दिलीप पुस्तके, अभिजीत काबुगडे, आनंदराव शेवाळे, अंकुश राजपूत, पिंटू यलमर, अशोक चौगुले, जनार्दन देशमुख, जालिंदर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीस प्रास्ताविकात संस्थेचे कार्याध्यक्ष राजाराम कचरे यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. यावेळी दहावीचे विद्यार्थी श्रावणी देशमुखे, श्रावणी मदने, श्रीराम देशमुखे ,प्रथमेश देशमुख, रिधन तुपे, यांनी आपले मनोगत व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस ब्लॅकबोर्ड भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख बी.के सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनील येलमर सर यांनी मानले. अनंत इंग्लिश स्कूल मायणीचे दहावी बॅच २०२६ च्या विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीपराव येळगावकर, अँड.सूरज पाटील, उर्मिला येळगावकर, प्रसाद जुगदर, सौ. अनिता कोळी , राजाराम कचरे, यांचेसह अन्य मान्यवर.


