रिक्षाचालकास मदतीचा हात…..बंद घरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन होत्याचे नव्हते झालेल्या कुटुंबास अन्याय विरोधी संघटनेचा मदतीचा हात.
समाजसेवक दिलीप मालवणकर यांचे अश्याही अवस्थेत दातृत्व जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.ज्येष्ठ पत्रकार व समाज सेवक दिलीप मालवणकर यांनी आज आपल्या अनोख्या दातृत्व गुणाचा प्रत्यय दाखवून समाजा पुढे अनोखा आदर्श निर्माण केला.
गेल्या पाच फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना जबर मारहाण झाल्याने हात, पाय, छाती व पोटावर मार लागला. तसेच खांद्याचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने गंभीर दुखापत झाली होती.याही अवस्थेत त्यांना शाळा नं. 14 जवळील एका रिक्षा चालक पंकज नामदेव बनकर यांचे घरातील फ्रिज च्या कॉम्प्रेसर फुटून घरातील सर्व समान, कपडेलत्ते जळून गेले.
हे कळताच पंकज बनकर या रिक्षाचालकाची अवस्था बघून अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दिलीप मालवणकर यांनी स्वखर्चाने त्यांना,स्वयंपाक घरातील सर्व भांडी, शेगडी, दोन महिने पुरेल इतके किराणा व जीवनपयोगी साहीत्य, कुटुंबासाठी कपडे, टॉवेल, चादरी असे साहित्य आज रोजी समितीच्या वतीने श्री रामेश्वर गवई, राजेश फक्के, शशिकांत दायमा, राजेश जगताप आदीच्या हस्ते रिक्षा चालक श्री पंकज बनकर यांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द केले.या मदतीमुळे बनकर कुटुंबीय भारावून गेले व त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.त्या मुळे दिलीप मालवणकर स्वतः जखमी असतानाही एका गरीब रिक्षा चालकाच्या कुटुंबीयास जो मदतीचा हात दिला
त्याबद्दल मालवणकर यांच्या दातृत्वाची शहरात चर्चा होत आहे. आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने मदत दिली नसताना दिलीप मालवणकर यांच्या नेतृत्वाखालील अन्याय विरोधी समितीने हे मानवतावादी कार्य केले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


