गौरव पवार यांच्याकडून खेळाडूंना स्पोर्ट ट्रॅकसूट वाटपमायणी दि.२० – प्रतिनिधी ,दत्ता कोळी
येथील युवा उद्योजक व ओम ज्वेलर्सचे मालक गौरवशेठ पवार यांनी मायणी मध्ये गेली १९ वर्षे कार्यरत असणाऱ्या यश तायक्वांडो अँड स्पोर्ट क्लबच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणार्थ तसेच आत्मनिर्भर बनवण्याच्या कार्यात मदत म्हणून स्पोर्ट ट्रॅकसूटचे वाटप केले.
स्पोर्ट क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शिवाजी लोहार यांच्या कार्याचा व खेळाडूंचा कार्याचा आढावा घेऊन या अकॅडमी अंतर्गत कित्येक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पदक विजयी प्राप्त झालेले आहेत. तसेच अनेक खेळाडू शासकीय नोकर भरतीमध्ये व निमशासकीय नोकरी भरतीमध्ये समाविष्ट आहेत. मायणीतील लहान मुलांपासून ते युवा पिढीपर्यंत तायक्वांदो, मैदानी खेळ, आंतरराष्ट्रीय व ऑलम्पिक दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य योगा ,फिटनेस, सारखे धडे या प्रशिक्षण वर्गातून दिले जातात .हा स्पोर्ट क्लब समाजासाठी आदर्श ठरत आहे. हे कार्य मायणी व पंचक्रोशीत अतुलनीय आहे.
यामुळे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ही छोटीशी मदत केल्याची भावना युवा उद्योजक श्री.गौरव शेठ पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्या ओम ज्वेलर्स या उद्योगातून या खेळाडूंना क्रीडा साहित्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रॅक सूट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक श्री सुधीर सर यांनी गौरव पवार यांचे आभार मानले.


