बांगलादेशी घुसखोरीवर गर्जना… पण आता मौन का?
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.दि. २० फेब्रुवारीच्या सामना मधील बातमीनुसार भाजपाच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागातील एका पदाधिकाऱ्याबाबत बांगलादेशी नागरिकत्व आणि खोट्या कागदपत्रांचा गंभीर आरोप समोर आला आहे, तसेच चौकशी सुरू असल्याचा उल्लेख आहे.जर ही बातमी खोटी असेल — तर तात्काळ अधिकृत खंडन करा!जर चौकशी सुरू असेल — तर तिची स्थिती जाहीर करा!देशात “घुसखोरांना बाहेर काढू” अशी घोषणा देणारे आता शांत का?राष्ट्रीय सुरक्षेवर भाषणं करणारे पारदर्शकतेपासून दूर का?खोट्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व मिळत असेल, तर ही केवळ एका व्यक्तीची बाब नाही — ही संपूर्ण पडताळणी व्यवस्थेची पोलखोल आहे.सीमा सुरक्षा, स्थानिक प्रशासन, निवडणूक यंत्रणा — सगळ्यांची जबाबदारी ठरली पाहिजे.देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा नाही.ती आहे — स्वतःवर प्रश्न आले तरी उत्तर देण्याचं धैर्य.मौन ठेवलं तर संशय वाढतो.स्पष्टीकरण दिलं तर सत्य स्पष्ट होतं.जनतेला घोषणांपेक्षा उत्तरं हवी आहेत!


