उसी ने आग लगायी बस्ती में और पुछता है माजरा क्या है ?
– महेंद्र प्रताप चांद ज्याने आग लावली तोच साळसुदपणे विचारत फिरतोय ही काय भानगड आहे ?
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.माझ्यावरील भ्याड हल्ल्याचे सूत्रधार साळसुदपणाचा आव आणत मोकाटपणे फिरत आहेत. त्यांना वाटते आजवर आपण इतके हल्ले पचवले, मॅनेज केले किंवा दडपले तसा हा हल्ला देखील पचवू. पण यावेळी गाठ दिलीप मालवणकरशी आहे. माझी आजवरची सर्व आंदोलने चिकाटीने लढलो व जिंकलो. हा तर माझ्या अस्मितेवर व पत्रकारिते वरील वैयक्तिक हल्ला आहे. तो मी जीवाची बाजी लावून लढणार, त्याच्या आड जे येतील त्यांना आडवे करुन अंतिम ध्येय – सूत्रधारांना अद्दल घडवणे ते गाठणार. मी आधीच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केलीच आहे. यापुढे अजून वाट पाहून पोलीस प्राधिकरण, उच्च न्यायालय व गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात ही जाईन. या हल्ल्यात माझ्या हातातील तीन लाख किमतीचे ब्रेसलेट गेले त्याबाबत पोलीस उदासीन दिसत आहेत. मी माझा पुरवणी जबाब घ्यावा म्हणून पोलिसांकडे तगादा लावला तरी ते पुरवणी जबाब नोंदवत नाहीत. कारण माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जखमी अवस्थेत असताना पोलिसांनी जो जबाब घेतला त्यात मानसिक धक्का बसल्याने, काही नंतर कळलेल्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्याची नोंद होणे आवश्यक आहे. माझ्या खांद्याचा सांधा निखळला, दोन fracture आहेत. त्यामुळे या जबरी मारहाणीची fir व chargesheet मध्ये दखल घेणे आवश्यक आहे. आज 18 दिवस झाले तिसरा आरोपी सापडलेला नाही, हल्ल्यात वापरलेली विना नंबर प्लेटची स्कूटर सापडलेली नाही. सूत्रधारांची सुस्पस्ट नावे देऊनही त्यांची चौकशी केली जात नाही, 120B कलम का लावले जात नाही. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे.सुपारी देऊन एका पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यास संपविण्याचा हा प्रयत्न होता. त्यावेळी जर लोकं जमली नसती तर कदाचित मला ठार मारले असते. यातील हल्लेखोर हे सराईत गुंड आहेत. त्यांची माझी साधी तोंड ओळखही नाही. ते मला का मारती? सूत्रधार त्यांना अधिक पैसे देऊन खोटी कथा रचू शकतो. हा हल्ला सुनियोजित होता कट करुन व त्यासाठी रेकी करुन केलेला हल्ला होता, हे एव्हाना पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.*अन्याय करणाऱ्या पेक्षा गुन्हेगारांना संरक्षण देणारा मोठा गुन्हेगार असतो. पोलीस कोणती व कशी भूमिका बजावतात हे लवकरच दिसून येईल. तो पर्यन्त मी Wait and watch करणार आहे.*


