बंजारा समाज म्हणजे दहिवडीसाठी भुषण:सौ.सोनिया गोरे
बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत सेवालाल महाराजांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त दहिवडी पंचक्रोशीतील बंजारा समाज बांधवांनी एकत्र येत एकतेचे दर्शन घडवले.सकाळी १०ः३० च्या सुमारास दहिवडी एस टी स्टॅंडपासून डिजेच्या तालावर समाजातील बांधवांनी जल्लोष व्यक्त केला.
त्यानंतर सर्व समाजबांधवांनी दहिवडी नगरपंचायत येथे जाऊन संत सेवालाल महाराजांच्या फोटोला पुष्प अर्पण करुन आशीर्वाद घेतले.त्यावेळी माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव,सागर पोळ,नगरसेवक रुपेश मोरे,मुख्याधिकारी संदिप घार्गे,रुपेश राठोड,परसू चव्हाण,भरत राठोड,दिलीप चव्हाण,सुरेश राठोड,नारायण राठोड,विजय चव्हाण,बाळू राठोड,मच्छिंद्र चव्हाण,यशवंत राठोड,कैलास राठोड,सुभाष चव्हाण,संजय राठोड,सचिन राठोड,रमेश चव्हाण यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजबांधवांनी समाजाची वेशभूषा परिधान करून पारंपरिक कलेचे सादरीकरण केले.त्यांनंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी संत सेवालाल महाराजांना पुष्प अर्पण केले.यावेळी माजी नगराध्यक्ष निलम जाधव,नगरसेविका वर्षाराणी सावंत,अतुल जाधव,विलास उर्फ बाळासाहेब सावंत,प्रशांत वायदंडे,सुरज गुंडगे उपस्थित होते.दरम्यान त्यांनी समाजातील महिलांसोबत पारंपरिक नृत्यावर ठेका धरत भन्नाट डान्स केला.तो डान्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


