मानवाधिकारांच्या रक्षणासाठी सज्ज व्हा _ अमरदीप आपगेवलखड येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची कार्यशाळा संपन्नमायणी
, ता.खानापूर जिल्हा सांगली या गावात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची (IHRSJC) मासिक बैठक आणि मानवाधिकार कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतोष बजाज आणि राष्ट्रीय मुख्य संयोजक डॉ. विश्वदीप आपगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शनकार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी आयोगाचे राष्ट्रीय मुख्य उपाध्यक्ष अमरदीप आपगे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांना आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे दिले प्रशिक्षणकार्यशाळेत मानवाधिकार क्षेत्रात कशा प्रकारे काम करावे, पीडित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्या कायदेशीर बाबींची मदत घ्यावी आणि मानवाधिकाराचा प्रचार-प्रसार तळागाळातील लोकांपर्यंत कसा करावा, याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, आगामी काळात राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची आणि प्रकल्पांची रूपरेषाही यावेळी निश्चित करण्यात आली.प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थितीया कार्यशाळेचे नेटके नियोजन खानापूर तालुका अध्यक्ष तानाजी बाबर यांनी केले होते.
कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र इंचाज बाबासाहेब कुंभार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आर. टी. सगर, सचिव सिद्धेश्वर चव्हाण, कार्याध्यक्ष गंगाधर कोळी, सांगली जिल्हा मुख्य समन्वयक दादा सोतळे, सातारा जिल्हा मुख्य उपाध्यक्ष अमोल माळी, सांगली जिल्हा महिला अध्यक्षा रंजना माळी, खानापूर तालुका उपाध्यक्ष माणिकराव माने, पत्रकार दत्ता कोळी यांच्यासह नामदेव केंगार, भरत सूर्यवंशी, अर्जुन मदने, आबा ठाणे, शंकर आतकरे, बाबासो पाटोळे, आकाश चव्हाण, संजय जाधव, शंकर जाधव, काकासो जाधव, गुजले साहेब, प्रवीण खोपकर, गोरख घाडगे आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी खानापूर तालुका अध्यक्ष तानाजी बाबर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


