साताऱ्यात ‘भिनवाडा’ कादंबरीवर रंगणार साहित्य संवाद; छत्रपती शिवाजी कॉलेजचा पुढाकार
मायणी:_ प्रतिनि
धीकर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा संवर्धन पंधरवडा व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एका विशेष ‘साहित्य संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता कॉलेजच्या लोकनेते रामशेठ ठाकूर अभ्यासिका हॉल क्र. ५६ येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षणया संवाद सोहळ्याचा केंद्रबिंदू ‘भिनवाडा’ ही कादंबरी असणार आहे. विशेष म्हणजे ही कादंबरी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या बी.ए. भाग-३ मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात कादंबरीचे लेखक मा. बाळासाहेब कांबळे आणि मा. सुनील शेडगे प्रामुख्याने सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.चर्चेचे प्रमुख मुद्देया चर्चासत्रात ‘भिनवाडा’ कादंबरीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने:कादंबरीची लेखनप्रेरणा आणि स्वरूप.निवेदनशैली आणि पात्ररचना.सामाजिक व सांस्कृतिक वास्तव.लेखकाचा दृष्टिकोन आणि कादंबरीतील मूल्यविचार.आयोजक व उपस्थितीया कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या भाषा मंडळ, मराठी विभाग आणि वाङ्मय मंडळाने केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. प्रियांका कुंभार, प्रा. (डॉ.) सविता मेनकुदळे, प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्यासह मराठी विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.साहित्यप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी या ज्ञानवर्धक चर्चासत्रात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


