• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

साहेब, आज तुम्ही हवे होतात… तो पक्ष माझा कसा म्हणू मी ??ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
February 28, 2026
in Uncategorized
0
साहेब, आज तुम्ही हवे होतात… तो पक्ष माझा कसा म्हणू मी ??ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

साहेब, आज तुम्ही हवे होतात… तो पक्ष माझा कसा म्हणू मी ??ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र.

*शिवसैनिक हेच माझे आप्तस्वकीय व शाखा हेच माझे मंदिर म्हणणारे व तसे वागणारे साहेब आप जैसा कोई नही*

आज माझ्यावर हल्ला होऊन 23 दिवस झाले परंतू एकाही शिवसेना नेत्याचा सहानुभूतीदर्शक साधा फोन नाही. ते जाऊ द्या, साधा मेसेज नाही की हल्ल्याचा निषेध नाही. तेच जर आपण असता तर धावून आला असतात. चौकशी केली असती, पोलिसांना फैलावर घेतले असते. पण तुमच्या सारखी दानत कोणातच नाही. किती म्हणून नावे घेऊ ?

पक्ष प्रमुख व आदित्य ही हिमालयापेक्षा उंच माणसं. त्यांना एका सर्वसामान्य शिवसैनिकाची सावली दिसणार नाही, हे आपण गृहीत धरू. पण ते पायलीचे पन्नास नेते, उपनेते, स्टार प्रचारक व ढीगभर नेते माणुसकीचा कोळसा केला हॊ त्यांनी नावच घ्यायचे झाले तर विनायक राऊत, गुरुनाथ खोत, हर्षल प्रधान, रवी म्हात्रे,सुषमाताई अंधारे, शरद कोळी, ज्योती ठाकरे, अयोध्या पोळ, अल्ताफ शेख, राजन विचारे, केदार दिघे, बंड्या साळवी या पैकी एकाही नेत्याला वाटले नाही की आपण आपल्या एकनिष्ठ व लढावू शिवसैनिकाची चौकशी करावी, निदान भ्याड हल्ल्याचा निषेध तरी करावा.

आजवर 53 वर्षे मी निष्ठेने वागलो, पक्षासाठी अनेकांशी पंगा घेतला, 14-14 केसेस अंगावर घेतल्या, पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर तुफान शाब्दिक हल्ले केले. तेही त्यांच्या बालेकिल्ल्यात राहून. “गद्दारांना क्षमा नाही”, हा ज्वालाग्रही लेख संग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला, त्यावरून भा. दं. सं. च्या 153अ कलमखाली माझ्यावर गुन्हा दाखल झाला. तरी मी मागे हटलो नाही. कोट्यावधीची आमीषे लाथाडली.माझ्या वर पाच फेब्रुवारी रोजी झालेला हल्ला हा मी माजी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी ऐनवेळी पक्षाचा अवसानघात करुन धोका दिला व भाजपात प्रवेश करुन पक्षाला वाऱ्यावर सोडले म्हणून निवडणूक काळात जी लेख मला लिहिली व ज्यामुळे धनंजय बोडारे चे पूर्ण पॅनल भुईसपाट झाले, घराणेशाही मोडीत निघाली.

त्याचा राग म्हणून सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन तो भ्याड हल्ला केला.या प्रसंगी कल्याण जिल्हा स्तरावरील बहुसंख्य पदाधिकारी व शिवसैनिक ( बोडारे भक्त सोडून ) मोठ्या संख्येने आले. माझे शेकडो वाचक व हितचिंतक प्रत्यक्ष भेटले. दूरच्यांनी फोन वर चौकशी केली. परंतू पक्ष पातळीवर माझी उपेक्षाच झाली. एखाद्या नेत्याच्या कुत्र्याला जरी ताप आला, तर बुके घेऊन धावणाऱ्या, नेत्याला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले तरी गर्दी करणारे, माझ्या वरील प्राणघातक हल्ल्याला आज 23 दिवस लोटले तरी झोपेतून जागे झाले नाहीत का?

मी सर्व बाबतीत स्वावलंबी, सक्षम आहे. मला मदतीची अजिबात गरज नाही. पण अश्यावेळी माणुसकीचा कोळसा झालेला पाहून मन उद्विघ्न होते. आयुष्यातील 53 वर्षे वाया गेली असे वाटते, हेच फळ काय मम तपाला? असे वाटू लागते. *माझ्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिक व पत्रकारास जर अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य व गरीब शिवसैनिकांनी कोणाच्या जीवावर आपल्या नेत्यांवर व पक्षावर जीव ओवाळून टाकावा ?*या उलट मी ज्यांच्यावर आग पाखड केली, टिकेची, झोड उठवली ते शिंदे सेनेत गेलेले माझे जुने शिवसैनिक मित्र मोठ्या संख्येने धावून आले. असंख्य लोकांनी विचारपूस केली.

साहेब याच वृत्तीला कंटाळून आम्हीही नाईलाजाने पक्ष सोडला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आणि याच लोकांची संभावना मी गद्दार ~ गद्दार अशी करीत राहिलो. *जो पक्ष प्राणघातक हल्ल्याच्या वेळी साधी विचारपूस करीत नाही, जिथे माणुसकीचा लवलेश नाही, तो पक्ष माझा कसा म्हणू मी?*

Views: 50
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..

सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)