• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

‘ राज्यपालांनी क्रिकेटपटूला आपला एडीसी बनवले ! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
March 6, 2026
in Uncategorized
0
‘ राज्यपालांनी क्रिकेटपटूला आपला एडीसी बनवले ! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

….’या’ राज्यपालांनी क्रिकेटपटूला आपला एडीसी बनवले !

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ४ – ५ महिन्यांनी मुंबईचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जॉन कॉलव्हील मायदेशी गेले.

त्यांचा गव्हर्नर पदावरील शेवटचा दिवस होता ५ जानेवारी १९४८ !

दुसऱ्या दिवशी मुंबई प्रांताचे पहिले भारतीय राज्यपाल म्हणून राजा महाराज सिंह यांनी शपथ घेतली.

जॉन कॉलव्हील जाण्याच्या पाच दिवस अगोदरच, म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर १९४७ रोजी त्यांचे (ब्रिटिश) मिलिटरी सेक्रेटरी मेजर बेनेट हे सेवानिवृत्त होणार होते.

त्यानंतर आणखी काही दिवसांनी गव्हर्नर कॉलव्हील यांचे दोन्ही (ब्रिटिश) एडीसी (एड – ड – कॅम्प) भारत सोडून जाणार होते.

यापैकी एक एडीसी होते कॅप्टन स्टीवर्ट (Stewart) व दुसरे एडीसी होते कॅप्टन मेथ्यून (Methuen) !

दोन्ही एडीसी साधारण २४ जानेवारी (१९४८) पर्यंत उपलब्ध राहतील. मुंबई राज्यासाठी नवे भारतीय गव्हर्नर नियुक्त झाल्यावर, त्यांना गरज असल्यास, एडीसी काही काळ थांबण्यास तयार आहेत. परंतु तसे केल्यास त्यांचे वेतन कसे द्यायचे हे मात्र ठरवावे लागेल, असे गव्हर्नर कॉलव्हील यांनी कळवले.

मिलिटरी सेक्रेटरी अगोदर जाणार असल्याने (३१ डिसेंबर १९४७) त्यांचे काम तूर्तास दोनपैकी एका एडीसीला द्यावे व मधल्या काळात मिलिटरी सेक्रेटरीची कामे करण्यासाठी गव्हर्नर यांना तिसरा एडीसी द्यावा असे शासनाने प्रस्तावित केले.

एडीसी कॅप्टन स्टीवर्ट यांना मिलिटरी सेक्रेटरी पदाचा तात्पुरता चार्ज देण्यात आला.

दिनांक ६ जानेवारी १९४८ रोजी राजा महाराज सिंह यांची मुंबई राज्याचे भारतीय राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

स्वातंत्र्यानंतर मुंबईचे प्रांत सरकार गव्हर्नरचे ‘मिलिटरी सेक्रेटरी’ हे पद ठेवण्यास उत्सुक नव्हते.

शासनाने प्रस्तावित केल्यानुसार राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मिलिटरी सेक्रेटरी पद रद्द करण्यास अनुमती दिली.

परंतु त्या पदाची कामे करण्यासाठी ‘कॉम्प्ट्रोलर’ हे पद निर्माण करुन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुचविल्याप्रमाणे युवा आयएएस अधिकारी मेजर के टी सातारावाला यांची नियुक्ती करावी, असे सांगितले.

एडीसी असा असावा

दिनांक १७ फेब्रुवारी १९४८ रोजी राज्यपाल राजा महाराज सिंह यांनी मुख्यमंत्री (त्यांना प्रीमियर म्हणत !) बी जी खेर यांना एडीसी नियुक्त करण्यासंदर्भात पत्र पाठवले. हे पत्र वाचनीय आहे.

आपल्या एडीसी बद्दल अपेक्षा कळवताना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले ते असे: : ” select one or more suitable officers from the Army, Navy or Air Force of the rank of Sub-Lieut or having a good personality and nice manners. I would like an officer who does not drink alcohol and, if possible, does not smoke.”

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात एडीसी पदासाठी योग्य अधिकारी पाठविण्यासंदर्भात ब्रिगेडियर डी एस ब्रार, कमांडंट, बॉम्बे सब एरिया यांचेशी संपर्क साधतो असे कळवले.

ब्रिगेडिअर ब्रार यांनी राज्यपालांचे सचिव एल एम नाडकर्णी, आयसीएस यांना दोन लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे एडीसी पदासाठी सुचवली.

राज्यपालांनी त्यापैकी लेफ्टनंट कैलास (के एन ) बहल, RIN यांची एडीसी म्हणून नियुक्ती केली.

दुसरा एडीसी पाठविण्याबद्दल राज्यपालांच्या सचिवांनी दक्षिण कमांड मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल ई एन गोडार्ड यांचेशी संपर्क साधला.
परंतु, गोडार्ड यांनी काश्मीर येथील आणीबाणी परिस्थितीमुळे एडीसी पदासाठी माझ्याकडे सुयोग्य अधिकारी उपलब्ध नाहीत, असे उलट टपाली कळवले.

रुसी मोदी यांना एडीसी पदावर घेण्याची शिफारस

दरम्यान कुणी तरी मोठ्या व्यक्तीने राज्यपाल राजा महाराज सिंह यांचेकडे त्यावेळी भारतीय संघाकडून खेळणारे क्रिकेटपटू रुसी मोदी यांच्या नावाची एडीसी पदासाठी शिफारस केली.

राज्यपालांनी ती शिफारस स्वीकारुन रुसी मोदी यांना आपले सिव्हिलियन एडीसी म्हणून नियुक्त केले.

राज्यपालांचे सचिव नाडकर्णी यांनी ले. जन. गोडार्ड यांना “राज्यपालांनी आता रुसी मोदी यांची एडीसी पदासाठी निवड केली आहे. सबब,आपण नवे उमेदवार शोधण्यासाठी कष्ट घेऊ नये” असे कळवले.

राज्यपालांच्या शिफारसीनुसार दिनांक ३ एप्रिल १९४८ रोजी शासनाचे मुख्य सचिव एम डी भट यांनी रुसी एस मोदी यांची दिनांक १ एप्रिल १९४८ पासून राज्यपालांचे एडीसी या पदावर नियुक्ती केल्याचा आदेश काढला.

राज्यपालांच्या शिफारशीनुसार रुसी मोदी यांना दरमहा ५०० रुपये वेतन देण्याचे तसेच भाडे मुक्त (मलबार हिल येथे) निवासस्थान देण्याचे ठरले.

अश्याप्रकारे क्रिकेटपटू रुसी मोदी हे राज्यपालांचे एडीसी झाले.

रुसी मोदी त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळत होते आणि उत्तम फॉर्मात होते.

रुसी मोदी यांचा अल्प परिचय

रुस्तमजी शेरीयार ‘रुसी’ मोदी हे पारशी क्रिकेटपटू उत्तम फलंदाज होते. सन १९४६ ते १९५२ या काळात ते भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले. मोदी यांच्या कसोटी कारकिर्दीचा आरंभ सन १९४६ साली भारताच्या इंग्लंड दौर्‍यातील पहिल्या कसोटी सामन्यात, लॉर्ड्स येथे झाला.

हा सामना प्रामुख्याने अ‍ॅलेक बेडसर यांनी पदार्पणात घेतलेल्या अकरा बळींसाठी ओळखला जातो. रुसी मोदी हे एकूण १० कसोटी सामने खेळले व त्यांची फलंदाजीतील सरासरी ४६ होती.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची सरासरी ५३ होती. कसोटीत १ शतक आणि ६ अर्धशतके आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २० शतकेही त्यांच्या नावावर होती.

शिडशिडीत बांध्याचे सहा फूट उंच असलेले रुसी मोदी हे उत्तम टेबल टेनिस पटू देखील होते.

दरम्यान १९५२ साली रुसी मोदी यांना एसीसी लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीत चांगली ऑफर आली व त्यांनी राज्यपालांच्या अनुमतीने एडीसी पद सोडले.

एसीसी कंपनीत ते पुढे वरिष्ठ पदावर पोहोचले.

ब्रेबॉर्न स्टेडियम येथील सीसीआय पॅव्हिलियन येथे आलेल्या हृदय विकाराच्या धक्क्याने रुसी मोदी यांचे दिनांक १७ मे १९९६ रोजी निधन झाले.

Views: 33
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)