• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!

माणगंगा by माणगंगा
March 6, 2026
in Uncategorized
0
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!

*हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!*

*वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;* *मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश*

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.मुंबई/रत्नागिरी :

वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाचे सादरीकरण राज्यभर वादंग निर्माण झाल्यानंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्मात्यांची कडक शब्दांत ‘कानउघडणी’ केली. त्यानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी हे नाटक सद्यस्थितीत थांबवण्याचा आणि नाव, कथानक व पात्रांच्या नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय लेखी स्वरूपात दिला आहे.

*नेमके प्रकरण काय? :रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निर्माता श्री. जयप्रकाश पाखरे, वीरशैव समाज, लांजा निर्मित श्री. अमोल रेडीज लिखित आणि दिग्दर्शित अमोल रंगयात्रीतर्फे (लांजा) ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर झाले होते. हे नाटक पाहिल्यानंतर हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते संतापले. नाटकात वारकरी भक्तांना चक्क ‘हत्यारे’ म्हणून दाखवून संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे समोर आले. *मंत्र्यांचा हस्तक्षेप आणि कडक सूचना ! : विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री सतीश सोनार व श्री रवी नलावडे यांनी मुंबईत मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. या वेळी ना. सामंत यांनी तात्काळ नाटकाच्या निर्मात्यांना भ्रमणभाषवरून संपर्क साधला आणि संतांच्या नावाने चाललेला हा अनाचार थांबवण्याचे आदेश दिले. “नाटकाचे नाव बदला, पात्रांना दिलेली संतांची नावे हटवा आणि वारकरी संप्रदायाला हिंसक दाखवणारी संकल्पना त्वरित बदला,” अशा कडक सूचना मंत्र्यांनी दिल्या.

*निर्मात्यांची लेखी माघार:* मंत्र्यांच्या भूमिकेनंतर, नाटक निर्माते ‘वीरशैव समाज, लांजा’ यांनी हिंदु जनजागृती समितीला लेखी पत्र दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, “वारकरी संप्रदाय आणि समितीने घेतलेल्या आक्षेपांचा आदर राखून आम्ही हे नाटक थांबवत आहोत. आक्षेपार्ह प्रसंग आणि नावांमध्ये आवश्यक बदल करूनच पुढील सादरीकरण केले जाईल.”*नाटकातील अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह भाग :*१.* विठ्ठलाचे नाव घेणारे दाम्पत्य १० निष्पाप पाहुण्यांची हत्या करते, असे दाखवून वारकरी भक्तांना गुन्हेगार ठरवण्यात आले.*२.* नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’ आणि ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून होताना दाखवले, जो वारकरी संतांचा मोठा अपमान आहे.*३.* आई (जना) ही विठ्ठल नामात बेभान होऊन आपल्याच मुलाची (नामा) हत्या करते, असे अघोरी दृश्य दाखवून समाजाची दिशाभूल करण्यात आली.

“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या श्रद्धास्थानांची विटंबना कदापि खपवून घेतली जाणार नाही. मंत्री उदय सामंत यांनी वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन तातडीने जी कारवाई केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.”

Views: 53
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
तब्बल ७६ वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम !! ज्येष्ठ पत्रकार उमेश काशीकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

तब्बल ७६ वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम !! ज्येष्ठ पत्रकार उमेश काशीकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)