• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माधुरी भोसले-सावंत यांना ‘सावित्री कर्तबगार महिला सन्मान २०२६’ पुरस्कार प्रदान

माणगंगा by माणगंगा
March 10, 2026
in Uncategorized
0
माधुरी भोसले-सावंत यांना ‘सावित्री कर्तबगार महिला सन्मान २०२६’ पुरस्कार प्रदान

माधुरी भोसले-सावंत यांना ‘सावित्री कर्तबगार महिला सन्मान २०२६’ पुरस्कार प्रदान

दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुजन फाउंडेशन व सुजन संस्था मित्र परिवार समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “सावित्री कर्तबगार महिला सन्मान पुरस्कार २०२६” या कार्यक्रमात सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार माधुरी भोसले-सावंत यांचा सन्मान करण्यात आला.

लोणंद येथील अमृता मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशज नीताताई होले उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते माधुरी भोसले-सावंत यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या त्यांच्या वंशजांच्या हस्ते हा सन्मान मिळाल्याने अभिमान वाटत असून ही बाब माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना माधुरी भोसले-सावंत यांनी व्यक्त केली.माधुरी भोसले-सावंत या पत्रकारितेबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.

त्या वावरहिरे येथील मैत्रेय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, सामाजिक जनजागृती, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, महिलांसाठी मार्गदर्शन व प्रबोधन, मानसिक आरोग्य तसेच मोबाईलच्या अति वापराविषयी जनजागृती अशा विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.

सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्याचे कार्य त्या करत आहेत.या कार्यक्रमास नीताताई होले (अध्यक्ष, महिला फुले वंशज, पुणे), चित्राताई क्षीरसागर, शितल शेंळके-पाटील (संस्थापक अध्यक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरिकृष्णी महिला ग्रुप, लोणंद), अजित जाधव (अध्यक्ष, सुजन फाउंडेशन), योगेश सावंत, विद्या शिंदे योगशिक्षिका फलटण, अर्चना गडहिंग्लजकर शिरवळ, रजनी शिंदे, नजमा पठाण, डॉक्टर दिपाली क्षीरसागर, डॉ. जयश्री यादव, अश्विनी जाधव, सुनीता जाधव, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ शेळके यांनी मानले.

या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पुढे यावे, असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला.

Views: 30
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
*कोंढावळ येथे’क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची पुण्यतिथी साजरी

*कोंढावळ येथे'क्रांतीज्योती' सावित्रीबाई फुले याची पुण्यतिथी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)