मायणी येथे आज(गुरुवार) १६ वे युवा ग्रामीण साहित्य संमेलन डॉ. रफीक सूरज अध्यक्षपदी
मायणी – प्रतिनिधी
कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणी यांच्या वतीने ‘अग्रणी महाविद्यालय योजने’अंतर्गत गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी १६ व्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रफीक सूरज यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्र गुदगे हे तर संयोजक प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे हे आहेत.संमेलनाच्या पहिल्या उद्घाटनाच्या सत्रात डॉ. श्यामसुंदर मिरजकर संमेलनाची भूमिका मांडतील.त्यानंतर स्वागताध्यक्ष सुरेंद्र गुदगे यांचे भाषण आणि संमेलनाध्यक्षांचे मुख्य भाषण होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात अँड. शुभदा कुलकर्णी यांच्या ‘कल्लोळ गोंदणांचा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आणि प्रा. सुभाष खोत यांचे विनोदी कथाकथन होणार आहे तर कविसंमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‘वापसा’कार कवी शिवाजी बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कविसंमेलन पार पडेल. याचे सूत्रसंचालन गझलकार महेश मोरे करणार आहेत.
या संमेलनात नाग-नालंदा प्रकाशनाच्या वतीने पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, मायणी व परिसरातील अनेक दिग्गज आणि नवोदित कवी आपली कविता सादर करणार आहेत. सदर संमेलनाची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ अशी राहील अशी माहिती, संमेलन संयोजकांकडून देण्यात आली आहे.फोटो – संमेलनाध्यक्ष डॉ. रफिक सुरज


