*केंद्रिय एकात्मीक सर्वेक्षणात महावीतरणची निचांकी कामगारी**महावितरणला १०० पैकी केवळ १.५ गुण*
केंद्र शासनाच्या उर्जा मंत्रालयाच्या वतीने पॅावर फायनान्स कार्पोरेशन या संस्थेने देशातील वीज कंपण्याचे सालाबादप्रमाणे एकात्मीक सर्वेक्षण केले आहे.२०२३-२४ या वर्षासाठी केलेल्या या १३ व्या एकात्मीक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ५२ वीज कंपन्यांमध्ये महावीतरणचा कामगीरीनिहाय शेवटचा क्रमांक लागला आहे.
खराब व्यवस्थापन ,प्रमाणापेक्षा अतिरीक्त गळती,वसुलीत कमालीची घट,कमजोर उपाययोजना या गंभीर दोषांमुळे महावीतरणची निचांकी कामगीरी नोंद झाली आहे.महाराष्ट्रात ३ कोटी वीज ग्राहक असलेल्या महावीतरणच्या कामगीरीला १०० पैकी केवळ ०१.५० गुण मिळाले असुन सी हा निचांकी दर्जा देण्यात आला आहे.२३-२४ या आर्थिक वर्षात गळतीचे उद्दिष्ट किंवा इतर कंपण्यांची गळती १५.२४ टक्के असताना महावीतरणची गळती तब्बल २४.३८ टक्के दिसुन आली असुन या अतिरीक्त प्रचंड गळतीमुळे करोडो रुपयांची हानी व नुकसान वीजग्राहकांवर लादले गेले आहे.
महावीतरणचे वीज दर हे देशातील सर्वात महागाडे वीज दर ठरले आहेत.वीजवसुलीच्या उद्दीष्टात मोठ्या घसरणीमुळे महावीतरणची थकबाकी २० हजार कोटी रुपयांपर्यंत गेली असल्याने महावीतरणची आर्थिक शिस्त बिघडली असुन व्याजाचा बोजा वीज ग्राहकांवर पडत आहे.राज्यातील इतर खाजगी वीज कंपन्यांची कामगीरी तुसनेने अत्यंत चांगली नोंदवीली गेली असुन अदानी पॅावरला ए प्लस रेटिंगसह प्रथम क्रमांक मिळाला आहे.या प्रकारामुळे पडद्याडुन महावितरणचेही खाजगीकरण व्हावे असा घाट घातला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.
महावीतरणच्या सुमार व्यवस्थापण व अतिरीक्त गळतीवर बोट ठेवत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मार्च २०२५ ला प्रस्तावित वीज दर वाढ नाकारली होती परंतु महावितरणच्या फेरविचार याचिकेमुळे नियामक आयोगानेही अनाकलनीय शरणागती पत्कारुन पुन्हा वीज दरवाढ लादली होती त्यावर सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार नुकताच पुन्हा जाहिर सुनावणी कार्यक्रम झाला असुन त्यांच्या निकालाची प्रतीक्षा असताना हा अहवाल आल्याने महावीतरणचा गलथान कारभार व नियामक आयोगाची हतबलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.किरण तारळेकरसदस्य,महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबई


