• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

…राज्यपाल अलेक्झांडर यांचे वर्तन त्याप्रसंगी अपरिपक्व वाटले : राज्यपालांचे माजी सचिव सतीश त्रिपाठी

माणगंगा by माणगंगा
March 15, 2026
in Uncategorized
0
…राज्यपाल अलेक्झांडर यांचे वर्तन त्याप्रसंगी अपरिपक्व वाटले : राज्यपालांचे माजी सचिव सतीश त्रिपाठी

*…राज्यपाल अलेक्झांडर यांचे वर्तन त्याप्रसंगी अपरिपक्व वाटले : राज्यपालांचे माजी सचिव सतीश त्रिपाठी*

उमेश काशीकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांचे सचिव म्हणून कार्य केलेले ज्येष्ठ (सेवानिवृत्त) सनदी अधिकारी सतीश त्रिपाठी यांचे हिंदी आत्मचरित्र ‘सरयू से सागर तक’ नुकतेच प्रकाशित झाले आहे.

आपल्या आत्मचरित्रात त्रिपाठी यांनी उत्तर प्रदेश मधील एका लहान गावी व्यतीत केलेले बालपण, कलकत्ता येथे उच्च शिक्षण, भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश, मसुरी येथे प्रशिक्षण त्यानंतर महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी म्हणून सांगली ते परभणी जिल्ह्यांमध्ये केलेले कार्य, नर्मदा बचाओ आंदोलन व आदिवासी समाज, मुंबई तसेच मालेगाव येथील दंगली, विविध देशांमध्ये केलेल्या प्रवासांचे वर्णन, भोजपुरी भाषेची सद्यस्थिती व गोपीनाथ मुंडे, विश्वनाथ प्रताप सिंह व रफिक झकारिया आदी नेत्यांसंबंधी व्यक्तिगत आठवणी नमूद केल्या आहेत.

सतीश त्रिपाठी डॉ अलेक्झांडर यांच्या राज्यपाल पदाच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात (१९९३-१९९८) त्यांचे सचिव होते. सन १९७२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेल्या त्रिपाठी यांनी राजभवनातील कार्यकाळ संपल्यानंतर शासनात विविध जबाबदारीच्या पदांवर काम केले व अतिरिक्त मुख्य सचिव पदावरुन निवृत्त झाले. राजभवन येथे राज्यपालांचे सचिव म्हणून रुजू होण्यापूर्वी त्रिपाठी हे मदत व पुनर्वसन सचिव या पदावर कार्यरत होते.

बाबरी मशीद पडल्यानंतर उसळलेल्या मुंबई दंगलींच्या संदर्भातील एक किस्सा त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये नमूद केला आहे. “पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कार्य केले असलेल्या अनुभवी डॉ अलेक्झांडर यांचे वर्तन एका प्रसंगी आपल्याला अपरिपक्व वाटले” असे त्यांनी त्यात नमूद केले आहे. मुंबई दंगलींसंदर्भातील त्यांनी सांगितलेला किस्सा व अलेक्झांडर यांचे संबंधी केलेले भाष्य त्यांच्याच शब्दात : “(मुंबईतील दंगलींच्या पार्श्वभूमीवर) राज्याचा पुनर्वसन सचिव या नात्याने मी नित्यनेमाने दंगलग्रस्तांसाठी उघडलेल्या मदत शिबिरांची पाहणी करत असे. त्या विपरीत काळात कोणत्याही मंत्र्याने अश्या शिबिरांना भेट दिली नव्हती; त्यामुळे स्वाभाविकच लोकांमध्ये असंतोष होता. ‘हज हाऊस’ येथे दंगलग्रस्तांसाठी एक शिबिर सुरु करण्यात आले होते.

तेथे साधारण एक हजार लोकांची व्यवस्था होती. प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी किमान ५००० लोक पोहोचले होते आणि दंगलग्रस्तांचा ओघ सुरूच होता. हे समजताच मी ‘हज हाऊस’ला जाण्याचे ठरवले. परिस्थिती बिकट होती. तेथे गेल्यावर काहीही अनुचित घडू शकेल अशी परिस्थिती होती. आम्ही हज हाऊसमध्ये गेलो. तेथे पराकोटीची दुरावस्था होती. लोकांची खाण्या-पिण्याची आबाळ होती, झोपण्यासाठी पुरेशी जागा नव्हती आणि सर्वत्र महिलांचा हलकल्लोळ ऐकू येत होता. हज हाऊसची पाहणी केल्यानंतर, आवश्यक वस्तूंची यादी तयार करण्यात आली. प्रत्येकाला रेशन कार्ड देण्याचा आदेश देण्यात आला, पिण्याचे पाणी आणि शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आणि आजारी लोकांना आरोग्य सुविधा देण्यात आल्या.

त्या वेळी , मंत्री गोंधळलेले आणि हतबल झाल्यासारखे वाटत होते. राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर, ज्यांचा सचिव म्हणून कालांतराने मी सलग पाच वर्षे काम केले, ते मात्र लोकांना मदत करण्याच्या कामात सक्रिय होते. एकदा त्यांचा फोन आला. ‘मी हज हाऊसला भेट देणार आहे, त्यावेळी आपण तेथे उपस्थित रहावे’ असे त्यांनी सांगितले. ठरल्या वेळी राज्यपाल तेथे पोहोचले. मी त्यांचा उपस्थित कार्यकर्त्यांशी परिचय करून दिला आणि त्यांनी संपूर्ण शिबिराची पाहणी केली.

मदत कार्याबद्दल आणि एकूण व्यवस्थेबद्दल डॉ. अलेक्झांडर यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर डॉ. अलेक्झांडर यांच्या सुचनेनुसार, मी त्यांना वांद्रे येथील दंगलग्रस्त ‘गोली बार’ वस्ती येथे घेऊन गेलो. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम लोकांची संमिश्र लोकसंख्या होती.सलोखा राखण्यासाठी तेथे अनेक बैठका आयोजित करण्यात आल्या. दोन्ही समाजांमधील लोकांचा सूर दंगलींविरुद्धच होता. चुका दोन्ही बाजूंनी झाल्या आहेत हे त्यांना पटले.

समाजात पुन्हा शांतता व बंधुभाव निर्माण व्हावा असे सर्वांनाच वाटत होते. दरम्यान, दंगली नियंत्रणात आणण्यात प्रभावी भूमिका बजावणारे सुनील दत्त यांनी पी सी अलेक्झांडर यांना दंगलग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. दत्त यांचे आमंत्रण अनपेक्षित होते; मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. ज्या भागात पाहणीसाठी जाण्याचा सल्ला सुनील दत्त यांनी राज्यपालांना दिला होता तो मुस्लिमबहुल आणि वादग्रस्त इलाखा होता. शिवाय, सुनील दत्त ‘मुसलमानांची बाजू घेऊन एकतर्फी काम करीत आहेत’, अशी लोकांची धारणा झाली होती.मी डॉ. अलेक्झांडर यांना आयत्यावेळी ठरलेल्या कार्यक्रमात बदल करू नये असा सल्ला दिला; परंतु त्यांनी सुनील दत्त यांचा सल्ला मानून त्यांच्यासोबत जाण्याचे ठरवले.

ही बातमी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कलानगर भागात पोहोचली आणि तेथील लोक प्रक्षुब्ध झाले. त्यांनी डॉ. अलेक्झांडर यांना घेराव घालण्याचे ठरवले. कलानगरमधील लोकांचा आरोप होता की ज्या ठिकाणी पाहणी करायची होती त्या ठिकाणच्या एका मंदिरात मांसाचे तुकडे फेकण्यात आले होते. डॉ. अलेक्झांडर यांनी त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक होते; परंतु सुनील दत्त यांच्या सांगण्यानुसार त्यांनी मुस्लिम वस्तीचा दौरा केला.इकडे, माझी गाडी जमावाने अडवली. जमावाने माझ्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु एका महिलेच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. कशीबशी मी सुटका करुन आपली गाडी तेथून बाहेर काढली. त्याच रस्त्याने पुढे जात असताना सुनील दत्त यांच्यावरही जमावाने हल्ला केला.त्या प्रसंगी डॉ. अलेक्झांडर यांचे वर्तन अपरिपक्व व्यक्तीसारखे वाटले. भारतीय प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर आणि इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून काम केलेल्या व्यक्तीकडून असे वागणे अपेक्षित नव्हते.

प्रोटोकॉलचे पूर्ण ज्ञान असूनही सुनील दत्त यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांचं असं स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकणे हे आकलनापलीकडचे होते. ते असो. मुंबईत दंगलीमुळे निर्माण झालेली परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी निश्चितच काम केले आणि त्यामुळे त्यांचे योग्य ते कौतुक देखील झाले.”

Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ईराण युध्दज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

ईराण युध्दज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)