• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

माणगंगा by माणगंगा
March 17, 2026
in Uncategorized
0
मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाअंतर्गत आशियायी विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या बाजार विकास व प्रोत्साहन या घटकाअंतर्गत शेतकरी अभ्यासदौरे व प्रक्षेत्र भेटी आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, कोल्हापूर यांच्यामार्फत दि. 10 ते 12 मार्च 2026 या कालावधीत शेतकरी अभ्यासदौरा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर अभ्यासदौरा प्रकल्प संचालक श्री विनायक कोकरे, मा. उपप्रकल्प संचालक डॉ. सुभाष घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. सदर अभ्यासदौऱ्यात कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्य़ातील एकूण 32 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये 8 महिला व 24 पुरुष उपस्थित होते. अभ्यास दौऱ्यासाठी कृषि व्यवसाय तज्ञ श्री. अनिल जाधव आणि श्री सत्यजित भोसले यांची अभ्यास दौरा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. कोल्हापूर विभागातील शेतकर्‍यांना शेतमाल प्रक्रिया आणि ब्रँडिंग बाबत सविस्तर माहिती मिळण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केलेला होता. अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वेंकटेश ॲग्रो प्रो.कं.लि., फलटण, के.बी. एक्सपोर्ट, फलटण तसेच पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक संस्था, सासवड या प्रक्रिया उद्योगांना भेट देऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग, निर्यात संधी व मूल्यवर्धन याबाबत माहिती घेतली.

अभ्यासदौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्राला भेट देण्यात आली. यामध्ये भाजीपाला प्रक्रिया केंद्र (VPF), विकिरण सुविधा केंद्र (IFC) तसेच व्हेपर हीट ट्रीटमेंट (VHT) सुविधा यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर अपेडा (APEDA), वाशी या संस्थेला भेट देऊन कृषी निर्यात प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.अभ्यासदौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे प्रक्षेत्र भेट देण्यात आली.

या भेटीदरम्यान विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती तंत्रज्ञान, फळबाग व्यवस्थापन व संशोधन कार्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.सदर शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पार पडला असून या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यात सुविधा व आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाली. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी व्यवसायात मूल्यवर्धन व बाजारपेठ विस्तारासाठी नवीन दिशा मिळणार असल्याचा विश्वास डॉ. सुभाष घुले यांनी व्यक्त केला.

Views: 22
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती – ४८ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!डॉ . तनुजा नाफडे…

आयुष्यातले सांगाती - ४९,नीतिन गडकरी,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)