• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राज्यपाल नवाब अली यावर जंग – एक सुहृद व्यक्तिमत्व उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
March 18, 2026
in Uncategorized
0
राज्यपाल नवाब अली यावर जंग – एक सुहृद व्यक्तिमत्व उमेश काशीकर यांचे मनोगत !!

*राज्यपाल नवाब अली यावर जंग – एक सुहृद व्यक्तिमत्व* उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.(मधुकर वि. देशपांडे हे मंत्रालयाच्या गृह विभागातून राजभवन येथे १९६६ – ६७ साली आले. त्यावेळी ते ‘इन्व्हिटेशन असिस्टंट’ या पदावर कार्यरत होते.

राजभवन येथील जवळपास तीस वर्षांच्या सेवेनंतर ते नोव्हेंबर १९९५ साली राज्यपालांचे उपसचिव (शिक्षण) या पदावरून निवृत्त झाले. देशपांडे आज ८९ वर्षांचे असून अजूनही समाज कार्यात आघाडीवर असतात. काही वर्षांपूर्वी देशपांडे यांनी राज्यपाल नवाब अली यावर जंग यांच्याविषयी हृद्य आठवण लिहून पाठवली होती. ती आठवण त्यांच्याच शब्दात देत आहे. — उमेश काशीकर) “सन १९७५ सालची गोष्ट आहे. पैगंबरवासी नवाब अली यावर जंग (१९७० – १९७६) हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते.नवाब साहेबांचे व्यक्तिमत्त्व अगदी भव्य-दिव्य होते.

मी त्यावेळी राज्यपालांच्या परिवार प्रबंधक कार्यालयात कार्यरत होतो. राज्यपाल महोदयांनी मला तसेच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पर्सनल स्टाफ’ म्हणून नेमले होते. त्यामुळे राज्यपाल महोदयांचा व त्यांची पत्नी बेगम झेहरा साहेबांच्या देखरेखीखाली काम करण्याचा वेगळाच अनुभव त्यावेळी मला मिळाला. खरे तर तो आम्हा नवख्यांसाठी एक शिकण्याचा काळ होता.’पर्सनल स्टाफ’ ची रजा मंजूर करताना सचिव महोदयांना किंवा परिवार प्रबंधकांना राज्यपाल महोदयांची अनुमती घ्यावी लागत असे. नंतरच रजा मंजूर होत असे.जून १९७५ या महिन्यात माझ्या आयुष्यात एक दुखद घटना घडली.

त्या घटनेने एरव्ही सुरळीत चाललेल्या माझ्या जीवनावर प्रखर आघात झाला. जून महिना असल्यामुळे राज्यपाल महोदय व काही निवडक अधिकारी व कर्मचारी पुणे येथे मुक्कामास होते. दिनांक २४ जून १९७५ चा तो दिवस होता. त्या रात्री माझी पत्नी सौ. शालिनी हिचे अगदी तरुण वयात अकस्मात निधन झाले. अधिकारी व कर्मचारी मित्रांना ही बातमी पुण्याला कळली. काही मित्रांनी शोकसंदेश पाठविले तर काही माझ्या मदतीला धावून आले. दोन-चार दिवसांनी नवाबसाहेब व बेगम साहेबा मला भेटण्यासाठी माझ्या घरी आले.

नवाब साहेबांना जिना चढणे वर्जित केले असल्याने मीच स्वतः मुलांना घेऊन त्यांना खाली येऊन भेटलो. एवढे मोठे व्यक्तिमत्त्व, पण ते सुद्धा चिंताग्रस्त झालेले मी पाहिले. त्यांच्या दोघांच्या सांत्वनपर शब्दांनी मी भारावून गेलो. स्वतःला सावरले. धार्मिक विधी पार पडल्यावर त्यांनी मला मुलांसह पुण्याला बोलावून घेतले.काही दिवसांनंतर मला माझ्या पत्नीच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला जाणे आवश्यक होते. त्याप्रमाणे दिल्ली-हरिद्वारला जाण्यासाठी रजेचा अर्ज मी सचिव व परिवार प्रबंधकांच्या मार्फत सादर केला.

तो अर्ज राज्यपाल महोदयांकडे गेला. नवाबसाहेबांनी मला व परिवार प्रबंधकांना बोलावून घेतले. नवाबसाहेब परिवार प्रबंधकांना म्हणाले की, ३-४ दिवसांनी ते स्वतः दिल्लीला जाणार असल्यामुळे त्यांच्याबरोबर ए.डी.सी. ऐवजी श्री देशपांडे यांना पाठवावे. त्यासाठी देशपांडेंना रजा घेण्याची आवश्यकता नाही. दिल्लीहून देशपांडेंना चटकन हरिद्वारला जाणे शक्य होईल. हरिद्वारला जाण्यासाठी मी देशपांडेंना योग्य ती मदत करीन, असेही त्यांनी सांगितले.राज्यपाल महोदयांच्या सूचनेप्रमाणे मी दिल्लीला निवडक कर्मचाऱ्यांसह निघालो. आदेशाप्रमाणे आम्ही सर्व राष्ट्रपती भवनात उतरलो. जाताना माझ्या दिवंगत पत्नीच्या अस्थी मी बरोबर नेल्या. नवाब साहेब व बेगम साहेबा दुसऱ्या दिवशी येणार असल्याने त्यांचे इतर अतिथींना भेटण्याचे कार्यक्रम सकाळी तयार केले. आल्याबरोबर मी नवाबसाहेबांना त्यांच्या कार्यक्रमाची प्रत सादर केली.

त्यावर नवाबसाहेब म्हणाले, “ते राहू द्या… देशपांडे, तुम्ही आपल्या दिवंगत पत्नीच्या अस्थी आणल्यात का? त्या आणल्या असतील तर विसर्जनाच्याआधी मी पण एक पुष्प वाहीन.”त्याप्रमाणे त्या अस्थींच्या कलशावर नवाबसाहेबांनी गुलाब पुष्प वाहिले.दुसऱ्या दिवशी त्यांनी मला गाडी देऊन हरिद्वारला पाठविले. राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांमार्फत हरिद्वार येथील पोलीस ठाण्यात त्यांनी मला मदत करण्यासंबंधीचा निरोप पाठविला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी ठरावीक आश्रमात उतरलो. हरिद्वारला सकाळी एक वयोवृद्ध पुरोहित मी उतरलेल्या आश्रमात आले. त्यांनी माझी विचारपूस केली व सकाळी १० वाजता हरिद्वारच्या घाटावर येण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे सकाळी १० च्या सुमारास मी घाटाच्या जवळ ठरावीक ठिकाणी पोहोचलो व पत्नीच्या अस्थींचे विधिवत विसर्जन केले.नवाब साहेबांसारखा एवढा मोठा मनुष्य माझ्यासारख्या सामान्य माणसाला व दुःखातील परिवाराला एवढे साहाय्य करतो व दुःखात एकरूप होतो, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व माणुसकीचा एक पैलू मला जवळून पाहायला मिळाला.माझ्या दुःखात नवाबसाहेबांच्या रुपाने मला मूर्तिमंत परमेश्वरच भेटले होते. त्यांच्या विशाल हृदयाची आठवण मी तेव्हापासून ठेवली आहे. माझ्या आई-वडिलांनी त्यावेळी जेवढी माझी काळजी घेतली त्यापेक्षाही थोडी जास्तच नवाब साहेबांनी व बेगमसाहेबांनी घेतली. अशा मोठ्या परंतु कोमल हृदयाच्या व्यक्ती मी राजभवनात पाहिल्या. यानिमित्ताने परत एकदा त्यांच्या थोर कुटुंबीयांचा उल्लेख करण्याची संधी मिळते आहे, याचा मला आनंद वाटतो.”

Views: 40
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
साहेब फक्त दोन दिवस मैदानात आले… अन्. आख्ख्या जिल्ह्यातील मोकळच नावाजलेल्यानच्या टाईट झाल्या..स्वप्नील पावणे यांचे मनोगत

साहेब फक्त दोन दिवस मैदानात आले… अन्. आख्ख्या जिल्ह्यातील मोकळच नावाजलेल्यानच्या टाईट झाल्या..स्वप्नील पावणे यांचे मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)