*अंकलेश्वर-बुरहानपूर महामार्ग तऱ्हाडी गावामधुन नेण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध; पर्यायी मार्गाची मागणी*तऱ्हाडी (प्रतिनिधी):
अंकलेश्वर-बुरहानपूर या प्रस्तावित चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे (NH-753B) काम सध्या भूसंपादनाच्या टप्प्यात असून, हा महामार्ग तऱ्हाडी गावाच्या मध्यभागातून नेण्यास स्थानिक गावकऱ्यांच्या तीव्र विरोध दर्शविला आहे.त-हाडी व ममाणे गावाचे अस्तित्व धोक्यात येईल आणि मोठ्या प्रमाणावर घरांचे ,व्यवसाय दुकानांचे शाळा, महाविद्यालये नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न प्रस्तावित आराखड्यानुसार महामार्ग तऱ्हाडी गावाच्या वस्तीतून जात असल्याने अनेक घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बाधित होणार आहेत.
यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.गावकऱ्यांचा हरकती या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर गांवकरी मोठ्या प्रमाणात बेघर होणार आहेत. गावकऱ्यांची घरे व व्यवसाय दुकाने गेल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.पर्यायी मार्गाची मागणी: महामार्ग गावाबाहेरून (बायपास) न्यावा, जेणेकरून गावाचे नुकसान टाळता येईल, अशी मागणी गावकऱ्यांनी माध्यमातून करण्यात आली आहे.प्रशासकीय सुनावणी भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत कलम ३(अ) नुसार नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यावर गावकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदवल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशाच प्रकारे मोबदला आणि अटींबाबत विरोध होत आहे.आंदोलनाचा पवित्रा जर प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सक्तीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तऱ्हाडी ग्रामस्थांनी दिला आहे.सध्या या महामार्गाचे काम तांत्रिक अडचणी आणि गावगऱ्याच्या हरकतींमुळे चर्चेत आहे. प्रशासनाने समन्वय साधून तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


