सिद्धनाथ ट्रस्टवरील सबळ पुराव्याअभावी केलेले आरोप निष्फळ ..चंद्रकांत पुजारी
माणगंगा न्युज नेटवर्क
खरसुंडी ता. आटपाडी येथील श्रीनाथदेव देवस्थान ट्रस्ट या संस्थेवर शिखर निचळ यांनी परवाच्या घेतलेला पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप हे जुनेच, व खोटे असून सर्व आरोप सबळं पुराव्याआभावी केलेले असून, केवळ देवस्थान ट्रस्टची बदनामी करण्याच्या हेतूने व राजकीय हेवेदेव्यातून केलेले आहेत असे श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी म्हटले आहे
.चंद्रकांत पुजारी पुढे म्हणाले मंदिरात असलेले सहा खांब, तसेच चांदीचा रथ याबाबतचे त्यांनी मीडिया पुढे केलेले आकडे धादांत खोटे असून, त्याबाबतचे त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. केवळ पूर्वग्रह दोषाने व राजकीय हेतूने ट्रस्टची व देवस्थानची बदनामी करण्याचा हा पुन्हा एकदा केविलवाना प्रयत्न केला आहे.या दोन मुद्द्द्यावर आम्ही यापूर्वी एकदा खुलासा दिलेला असून तुमच्याकडे अपहाराचे काही पुरावे असल्यास न्यायालयात जरूर सादर करावेत,
आम्हीही तेथे चांदीच्या तपशिलाबाबत आवश्यक ते पुरावे देऊ असे ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी म्हटले आहे.त्यात नवीन भर म्हणून निचळ यांनी भाविकांनी केलेल्या गुप्तदानाबद्दल खोटे आरोप केले आहेत. मंदिरात कोठेही गुप्तदान केले जात नाही, तसा कोणी आग्रहही करत नाही. कार्यालयात आलेल्या सर्व रोख स्वरूपातील देणग्या व वस्तू स्वरूपातील देणगी ही केवळ पावती देऊनच स्वीकारली जाते, त्याचे काटेकोर हिशोब ठेवले जातात.
गुप्त दानाविषयीची बातमी धादांत खोटी असून, भाविकांचे ते दान जर गुप्त असेल तर त्याचे वजन तुम्हाला कसे काय कळते ? याचे साधे उत्तर त्यांनी द्यावे. प्रसिद्धी माध्यमातून निचळ यांनी स्वतः देवस्थानचे माजी विश्वस्त असल्याची माहिती दिली आहे. यावरून त्यांच्या खोटेपणाची वृत्ती पुन्हा एकदा उघड होत आहे.
कोणत्याही पुराव्या अभावी देवस्थान ट्रस्टवर बदनामीचे आरोप करायचे आणि ट्रस्टमुळेच देवस्थान बदनाम होते आहे असा वरून अपप्रचार करायचा असा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे, ही नक्कीच निषेधार्य बाब आहे.आमचे त्यांना पुन्हा एकदा आवाहन आहे की तुम्ही करत असलेल्या आरोपा बाबत न्यायालयात पुरावे सादर करावेत आणि दाद मागावी.
केवळ भाविक आणि पुजारी, ट्रस्ट आणि पुजारी, ट्रस्ट आणि भावीक यांच्यामध्ये संभ्रमावस्था व मतभेद होऊ नयेत याची दक्षता घ्यावी अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने दाद मागण्याच्या प्रक्रियेत आहोतच हे या निमित्ताने सांगु इच्छितो.तरी येथून पुढील काळात त्यांच्या कोणत्याही प्रश्नांना आम्ही माध्यमातून उत्तर देणार नाही.
तर न्यायालयातच उत्तर देऊ .असे मत ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी मांडले.पुढे म्हणाले की अनेक दिवसापासून देवस्थानची बदनामी सुरू आहे .पुढील काळात बदनामी केली तर न्यायालयात उत्तर देणार आहोत.


