राजकारणात मोठी खळबळ – राघव चड्डा यांच्यावर मोठी कारवाईज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत ठामपणे आवाज उठवणारे, प्रभावी वक्तृत्वामुळे ओळख निर्माण केलेले राघव चड्डा आणि आता अचानक त्यांच्यावर पक्षाची मोठी कारवाई.
या कारवाईमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. पक्षांतर्गत बंडखोरी आणि पक्षांतर्गत सूक्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहेआम आदमी पक्षाने राज्यसभेतील उपनेतेपदावरून त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे. एवढंच नाही, तर राज्यसभा सचिवालयाला दिलेल्या पत्रात त्यांना बोलण्यासाठी वेळही देऊ नये, अशी सूचना करण्यात आल्याचं समोर आलंय — हा निर्णय किती गंभीर आहे, याची कल्पना यावरूनच येते.मग नेमकं घडलं काय?गेल्या काही महिन्यांपासून काही गोष्टी पक्षाच्या लक्षात येत होत्या:-1) मोठ्या न्यायालयीन निकालानंतर पक्षातील इतर नेते आक्रमकपणे समोर येत असताना, चड्डा मात्र शांत राहिले
.2) संसदेत मुद्दे मांडताना ते जास्त वेळ घेत असल्यामुळे इतर खासदारांना संधी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या.3) पक्षाच्या संघटनात्मक कामांपासून ते काहीसे दूर राहिल्याचंही बोललं जात आहे.4) सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याच्या बाबतीतही त्यांची भूमिका कमी आक्रमक दिसली.आणि याच पार्श्वभूमीवर…पक्षाने मोठा निर्णय घेत, राघव चड्डा यांना पदावरून हटवून अशोक मित्तल यांच्यावर जबाबदारी सोपवली.हा निर्णय फक्त एका नेत्याबद्दल नाही…हा संदेश आहे — पक्षशिस्त, सक्रियता आणि राजकीय भूमिका यामध्ये तडजोड चालणार नाही.पण मोठा प्रश्न अजूनही कायम…राघव चड्डा खरंच पक्षापासून दूर गेले होते का, की हा निर्णय राजकारणातील अंतर्गत रणनीतीचा भाग आहे?
खरं म्हणजे पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल जेलमधून सुटून आल्यानंतर या घटना घडल्या आहेत. राघव चड्डा हे संसदेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत होते. आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली होती.तुमचं मत काय?हा निर्णय योग्य की अन्यायकारक?


