झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार….. खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर….
झरे ता. आटपाडी येथील बँक ऑफ इंडिया मध्ये खातेदाराच्या परस्परच खातेदाराच्या खात्यावरील पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. याबाबत त्या खातेदाराला कोणतीही सूचना दिली जात नाही.
एका खात्यावरील दुसऱ्या खात्यावरती पैसे ट्रान्सफॉर्म करण्याची बँकेला परवानगी आहे का ? हाही संशोधनाचा विषय आहे.बँक ऑफ इंडिया मध्ये अनेक खातेदारांची खाते आहेत काही जणांची सेविंग खाते आहेत तर काही जणांचे कर्ज खाते आहेत. परंतु त्या खातेदाराने आपल्या गरजेपोटी सेव्हींग खात्यावर पैसे ठेवत असतो. या भागामध्ये शेतकरी वर्ग आहे.
अचानक खातेदाराला पैशाची गरज पडते स्वतःजवळ पैसे ठेवले तर ते खर्चून जातात, म्हणून प्रत्येक खातेदार हा खात्यावर पैसे ठेवतो आणि बँक मात्र खातेदाराला कोणतीही सूचना न देता खातेदाराच्या परस्पर ते पैसे इतर खात्यावर वर्ग करतात ,उदाहरण कर्ज खाते किंवा इतर खात्यावर , कर्जाच्या खात्यावर जर पैसे वर्ग केले तर जो कर्जाचा हप्ता आहे, किंवा त्याचे व्याज आहे.
तेवढीच रक्कम खातेदाराच्या सहमतीने रक्कम घ्यायला हरकत नाही. परंतु खातेदाराच्या परस्पर व्याजाच्या किंवा हप्त्याच्या जादा रक्कम कर्ज खात्याला वर्ग केली जाते. खातेदाराला विचारल्याशिवाय खातेदाराला सूचना दिल्याशिवाय बँक परस्पर खात्यावरील पैसे दुसऱ्या खात्यावर घेत असते .परंतु त्या खातेदाराला त्याची कल्पनाही नसते. जेवढी व्याजाची रक्कम आहे किंवा हप्त्याची रक्कम आहे तेवढी रक्कम घेतली तर काही हरकत नाही.
परंतु ज्यादा रक्कम कर्जाच्या खात्याला वर्ग करून घेतात .त्यामुळे भविष्यामध्ये खातेदार त्या बँकेमध्ये व्यवहार करण्यास धजवणार नाही…खातेदाराच्या पूर्वसंमतीशिवाय पैसे ट्रान्सफर करून घेणे हे बेकायदेशीरित्या आहे .त्या खातेदाराला सूचना देऊन पैसे ट्रान्सफॉर्मर करणे योग्य आहे. परंतु बँक ऑफ इंडियाच्या या मनमानी कारभारामुळे व्यवहारावर 100% परिणाम होणार असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.







