एकेकाळी झोपडीत राहिलेले रमेश जावीर आता राजमहाला मध्ये राहतात ……
राजमहल होय राजमहालच तो .त्यांनी राहत्या घराला संग्रहालयाचा आकार दिला आहे. आठ गुंठे परिसरामध्ये हे बंगला वजा घर असून त्यांनी त्यामध्ये जावीर काष्ठ शिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी ची निर्मिती केली आहे. या संग्रहालयात पाच प्रदर्शनदालने आहेत.
पुढे सभागृह वजा पोर्च आहे. पूर्वेला किचन बेडरूम बैठक रूम असून तिथंही पूर्वेकडे पोर्च आहे .पायऱ्या चढून वर जावे लागते. दक्षिणेला सभागृह तथा पोर्च तिन्ही बाजूला उतरत्या पायऱ्या असून मार्बल फरशी बसविली आहे. संग्रहालयाच्या दोन्ही बाजूला बैलगाडीची चाकी लावलेली आहेत .
आणि काचेच्या तावदान खिडक्या असून या बंगल्याला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशेला मोठे दरवाजे असून घराच्या सभोवताली दगडी तटबंदी तथा कंपाऊंड आहे .या बंगल्याच्या वरील भागावर जाण्यासाठी मोठा जिना असून जिन्यामध्ये वेगवेगळी पेंटिंग लावलेली आहेत .वरील मजल्यावर दोन खोल्या असून तिथे दोन कुटुंबे राहतात. खाली एक बैठक रूम असून तिथेही एक कुटुंब राहते. एकूण इमारतीमध्ये नऊ चौकटी आहेत .घराच्या परिसरामध्ये आंबा ,रामफळ ,पेरू ,नारळ ,पिवळा चाफा ,नाग चाफा , सोनचाफा ,निळा चाफा, इत्यादी शोची झाडे आहेत .फुल झाडांमध्ये लिली,जास्वंदी ,कुंड्यामध्ये लावलेल्या आहेत .एकूण या संग्रहालय रुपी घराला कोल्हापूर येथील न्यू पॅलेस ची रचना विचारत घेऊन बांधकाम केले आहे .घर तथा संग्रहालयाच्या पुढील बाजूस दुकाने तिन गाळे आहेत.
पुढील बाजूस खरसुंडी आटपाडी रोड जातो .या संग्रहालय रुपी घरामध्ये 300 हून अधिक पक्षी, प्राणी ,मानवी आकारातील नैसर्गिक काष्ट शिल्प सुंदररीत्या लावण्यात आलेली आहेत .अधून मधून चित्रकार सुधीर रमेश जावीर सह महाराष्ट्रातील नवोदित चित्रकाराची प्रबोधनात्मक पेंटिंग्स इथे लावण्यात आलेली आहेत .हे संग्रहालय पाहायला एक तास लागतो .इमारतीचे बांधकाम पूर्ण स्लॅब मध्ये केले असल्यामुळे सुंदररित्या सुशोभितअसे प्लास्टर झाले आहे .रंगकाम सु व्यवस्थित असून स्वच्छता, टापटीप पाहायला मिळते
.पर्यटक किंवा श्री रमेश जावीर यांचे मित्रमंडळी जेव्हा संग्रहालय पाहायला येतात तेव्हा इथून उठून वाटत नाही .बसूनच राहावे वाटते अशी या संग्रहालयाची ख्याती आहे .साहित्यिक काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचे बालपण झोपडीत गेले .अनेक संकटावर मात करत त्यांनी बी.ए .बी.एड इतके शिक्षण घेतले .आणि रयत शिक्षण संस्थेत वेगवेगळ्या शाखेत 34 वर्षे इंग्रजीचे अध्यापन केले. शिक्षकी पेशात मिळालेला सर्व पैसा या संग्रहालय उभारणीसाठी जागा विकत घेऊन हा राजवाडा तथा संग्रहालय उभारले आहे .
संग्रहालयाच्या सभोवती पेविंग ब्लॉक टाकलेले असून ते सुंदर रित्या बसविले आहेत. चार चाकी उभी करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले असून या शेडमध्ये झोपाळा बांधला आहे .या छोट्या झोपाळ्यावर त्यांची पाच नातवे झोपाळ्यावर झोके घेत असतात .रमेश जावीर यांची कौटुंबिक स्थिती चित्रकार सुधीर रमेश जावीर यांचे ए.टी.डी .जी.डी .आर्ट इतके शिक्षण झाले असून ते डिजिटल बॅनरचा व्यवसाय करतात .मकरंद हा बी.एससी .बी.एड झाला असून तो निवासी गुरुकुल आटपाडी येथे शिक्षक आहे .तीन नंबर निखिल तो डी फार्मसी बी फार्मसी झाला असून खरसुंडी पेठेला मेडिकल व्यवसाय करतो .चिरंजीव शौर्य ,अधिरा, आरुष, हर्षद ,निक्षिता ही नातवे संग्रहालयात कधी स्वच्छता करतात तर काही वस्तू इकडे तिकडे ठेवतात.
पण त्याची काळजी ही तितकीच घेतात .संग्रहालय घर स्वच्छतेला सुमारे एक तास दररोज लागतो .हे काम सर्वजण आनंदाने करत असतात .होय एकेकाळी मी झोपडीत राहिलेला माणूस आज राजवाड्यामध्ये राहतोय .येणारे पर्यटक पाहुणे यांचा पाहुणचार सुंदर रित्या केला जातो .हे खरं आहे. आपलाच ,रमेश जावीर सरसाहित्यिक, का ष्ट शिल्पकार.


