झरेत विधवा महिलेची फसवणूक कुटुंब आंदोलनाच्या तयारीत
झरे ता. आटपाडी जि. सांगली येथील शिक्षण संस्थेतील एका सहशिक्षकाने विधवा महिलेची फसवणूक करून 41 गुंटे जमीन ५ वर्षापुर्वी काहीही पैसे न देता ,आमिष दाखवुन खरेदी करून घेतली आहे.
त्यावेळी सदर शिक्षकाने इतर हक्कात नोंद असलेल्या संबधित विधवा महिलेच्या पुतण्याची सदर दस्तास मान्यता घेतली आहे. सदर गंभीर प्रकाराची चर्चा झरे परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. सदर विधवा महिला व तिचा पुतण्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.
वरील जमिनीच्या व्यवहाराची चर्चा झरे परिसरामध्ये त्या आवाजात सुरू आहे. यापूर्वी अशी अनेक प्रकरणी चांगली आहेत तरी या विधवा महिलेला न्याय मिळणार का अशी चर्चा परिसरामध्ये रंगली आहे.तर याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.


