नसरापूर येथील अत्याचार व हत्या करणाऱ्या आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्या… सकल मुस्लीम युवक जिल्हाअध्यक्ष अमीर हवलदार यांची मागणी
सांगली वार्ताहर
येथील सकल मुस्लिम युवक सांगली यांचा वतीने संघटनेच्यावतीने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेली चार वर्षीय निष्पाप चिमुरडीवरील अत्याचार व हत्या ही घटना अत्यंत संतापजनक, अमानुष आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे.
एका ६० वर्षीय नराधमाने एवढ्या लहान बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असून समाजमन सुन्न करणारी आहे.या घटनेमुळे राज्यातील माता-भगिनी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कोणतीही दया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा देणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाईल.असे निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना सकल मुस्लिम युवक संघटना सांगली यांच्या वतीने देण्यात आले.
सकल मुस्लिम युवक संघटना यांच्यावतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत जलदगतीने चालवून आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.भविष्यात अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेऊन उदाहरणार्थ कारवाई करावी. राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायदे, कडक अंमलबजावणी आणि विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्यात याव्यात.
यावेळी सकल मुस्लिम युवक संघटना सांगली जिल्हाअध्यक्ष अमीर हवलदार, जत तालुका अध्यक्ष महम्मद शेख, वाळवा तालुका अध्यक्ष तन्वीर संदे, वाळवा तालुका उपाध्यक्ष इर्शाद हवलदार, शादाब फकीर,साद दिवाण, मुद्दसर पठाण, फजल हवलदार, शरीफ शिकलगार,असीम इबुशे, तन्वीर दिवाण, अकबर शेख, सुहेल चाऊस, अमीर शिकलगार,आदी मुस्लिम युवक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


