• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खरसुंडीतील चांदी प्रकरणात देवस्थानच्या पुजाऱ्यांची भूमिका स्पष्ट……“ट्रस्ट कडे असलेल्या दानातील चांदीशी (पुजारी) गुरव समाजाचा संबंध नाही; ट्रस्टने खुलासा करावा”

माणगंगा by माणगंगा
May 9, 2026
in Uncategorized
0
खरसुंडीतील चांदी प्रकरणात देवस्थानच्या पुजाऱ्यांची भूमिका स्पष्ट……“ट्रस्ट कडे असलेल्या दानातील चांदीशी (पुजारी) गुरव समाजाचा संबंध नाही; ट्रस्टने खुलासा करावा”

खरसुंडीतील चांदी प्रकरणात देवस्थानच्या पुजाऱ्यांची भूमिका स्पष्ट……“ट्रस्ट कडे असलेल्या दानातील चांदीशी (पुजारी) गुरव समाजाचा संबंध नाही; ट्रस्टने खुलासा करावा”

खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिर येथील कथित चांदी प्रकरणावरून प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांत विविध चर्चा सुरू असताना (देवस्थानचे पुजारी)गुरव समाजाच्या वतीने कृष्ण मंदिर येथे पत्रकार परिषद घेऊन समाजाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टमध्ये भक्तांकडून दान स्वरूपात येणाऱ्या वस्तूंशी गुरव समाजाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत पुजारी समाजाची होत असलेली नाहक बदनामी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.

गुरव समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, गेली शेकडो वर्षे गुरव समाज श्री सिद्धनाथांची नित्य सेवा, पूजा व मंदिराची दिनचर्या पार पाडत आला आहे. मंदिरातील सेवेकरी, मानकरी व भाविक यांच्याशी समन्वय ठेवून कोणतीही तक्रार किंवा वाद निर्माण न होता ही सेवा अखंड सुरू आहे.पत्रकार परिषदेत पुजारी बांधवांनी सांगितले की, मंदिरातील पूजेचा मान गुरव समाजाला असला तरी खरसुंडी गावात साडेतीनशेहून अधिक गुरव बांधवांची घरे आहेत.

काहींना वर्षातून, काहींना दोन किंवा चार वर्षांतून तर काहींना दहा-पंधरा वर्षांतून आठ दिवस पूजेचा मान मिळतो. अत्यंत कमी उत्पन्नाच्या काळातही पुजारी बांधवांनी पदरमोड करून नाथसेवेत खंड पडू दिला नाही, असा इतिहास असल्याचे त्यांनी नमूद केले.सध्या सुरू असलेल्या चांदी प्रकरणामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात असून, मंदिरातील पुजाऱ्यांचा देवस्थान ट्रस्टमध्ये जमा होणाऱ्या दानातील वस्तूंशी कोणताही संबंध नसतानाही त्यांच्यावर संशय घेतला जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

संबंधित प्रकरणाबाबत देवस्थान ट्रस्टने भाविक व प्रसारमाध्यमांसमोर योग्य तो खुलासा करावा, अशी मागणीही गुरव समाजाच्या वतीने करण्यात आली.भाविकांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी तसेच समाजाची अधिकृत भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेस किशोर पुजारी, अर्जुन सावकार, लक्ष्मण पुजारी, महादेव जरंडकर, सुनील पाटील, दत्तात्रय पुजारी, राजू सावकार, तुकाराम पुजारी, विवेक पुजारी, अभिजीत पुजारी, राजू पुणेकर, गजानन पाटील, गजानन पुजारी, किरण पुजारी, चंद्रकांत पुजारी, अमोल पुजारी, अभिषेक सावकार, जगन्नाथ पुजारी, शिवाजी पुजारी, रावसाहेब पुजारी, नरहरी पुजारी, रोहित पुजारी, घनश्याम पुजारी, आदिनाथ पुजारी, सागर पुजारी, प्रवीण पुजारी, कैलास पुजारी, सिद्धेश्वर पुजारी, प्रवीण जरंडकर, अक्षय पुजारी, विशाल पुजारी, रविराज पुजारी, बापूराव पुजारी, प्रशांत जरंडकर, दिगंबर भांगे यांच्यासह गुरव समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.

Views: 60
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राजेंद्र खरात यांचे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट वरील आरोप चुकीचे .. चंद्रकांत पुजारी

राजेंद्र खरात यांचे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट वरील आरोप चुकीचे .. चंद्रकांत पुजारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)