• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राजेंद्र खरात यांचे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट वरील आरोप चुकीचे .. चंद्रकांत पुजारी

माणगंगा by माणगंगा
May 9, 2026
in Uncategorized
0
राजेंद्र खरात यांचे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट वरील आरोप चुकीचे .. चंद्रकांत पुजारी

राजेंद्र खरात यांचे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट वरील आरोप चुकीचे .. चंद्रकांत पुजारी

देवस्थान ट्रस्ट खरसुंडी या संस्थेच्या विरोधात आर.पी.आय. चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिनांक 6 मे 2026 रोजी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोप हे पूर्ण पणे चुकीचे आहेत.

याबाबत ट्रस्टच्या वतीने चेअरमन चंद्रकांत पुजारी यांनी खुलासा केला आहे..ट्रस्टचे चेअरमन चंद्रकांत पुजारी म्हणाले राजेंद्र खरात यांनी केलेले सर्व आरोप खोटे, व चुकीच्या माहितीच्या आधारे व कोणताही पुरावा नसताना केवळ ट्रस्टची बदनामी करण्याच्या हेतूने केलेले आहेत. ट्रस्टच्या कामकाजाचे सन 1994 पासून ते 2025 पर्यंतचे सर्व लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे.

व ते धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे येथे कोणत्याही अपहाराचा अथवा भ्रष्टाचाराचा विषय उपस्थित होत नाही.मंदिराच्या गाभाऱ्यातील दोन अष्टकोनी खांबावरील चांदी जीर्ण झाल्यामुळे दुरुस्तीसाठी काढलेली असून, त्यासाठी आवश्यक मासिक मीटिंगचा ठरावही केलेला आहे. चांदी काढताना त्याचा रीतसर पंचनामा होऊन ती दुरुस्तीसाठी कारागिराकडे पोहोच पावतीसह व विश्वस्तांच्या समक्ष दिलेली आहे. त्याचे लाकडावरील नक्षीकाम सुरु असून त्यावर चांदीचे नक्षीकाम बसणार आहे व ते संपूर्ण नक्षीकाम या महिन्यापर्यंत अष्टकोनी खांबावर बसवले जाणार आहे.

मागील महिन्यात चांदी कामासाठी आवश्यक असणाऱ्या लाकडाची उपलब्धता लवकर न झाल्यामुळे या कामासाठी थोडा विलंब झाला आहे. चांदी अर्पण केलेल्या भाविकांनाही संबंधित कारागिराकडे नेऊन ते दाखवण्यात आले आहे.राजेंद्र खरात यांनी देवस्थानच्या तथाकथित भ्रष्टाचाराबाबत दिलेली सोने व चांदीची आकडेवारी ही मनघडन , चुकीची व अर्धवट माहिती घेऊन दिलेली आहे व संबंधित वस्तूंचे वजन हे देखील कुठलाही पुरावा नसताना व मनमानी पद्धतीने माध्यमासमोर मांडली आहे .अशा विपर्यास्त वक्त्यामुळे तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या भाविकांमध्ये, जनतेमध्ये, देणगीदारांच्या मध्ये देवस्थानबद्दल दिशाभूल होवून गैरसमज पसरतो आहे, ही दुर्दैवी बाब आहे.

या सर्व बाबींची त्यांनी माहिती घेऊन नंतर वक्तव्य केले असते तर ते योग्य झाले असते.मागील महिन्यात राजेंद्र खरात यांनी धर्मादाय कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ट्रस्टच्या कामकाजाची चौकशी सुरू असून, प्रस्तुत कार्यालयाच्या चौकशी अहवालाची वाट न पाहता त्यांनी उपोषणाचा व आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचा धमकीवजा इशारा माध्यमातून दिला आहे

, व ट्रस्टच्या विरोधात पूर्णतः खोटे आरोप केलेले आहेत. तरी या धार्मिक संस्थेची व तीर्थ क्षेत्राची नाहक बदनामी त्यांनी करू नये व भाविक आणि जनतेमध्ये संभ्रम व गैरसमज पसरवू नयेत असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.फोटो चंद्रकांत पुजारी अध्यक्ष सिद्धनाथ ट्रस्ट

Views: 77
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
खरसुंडी देवस्थानचा ‘चांदी घोटाळा’ ; ट्रस्ट बरखास्तीची मागणी ‘धर्मादाय’ संशयाच्या भोवऱ्यात,राजेंद्र खरात यांचा १५ मेपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

खरसुंडी देवस्थानचा ‘चांदी घोटाळा’ ; ट्रस्ट बरखास्तीची मागणी ‘धर्मादाय’ संशयाच्या भोवऱ्यात,राजेंद्र खरात यांचा १५ मेपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)