पांगरीत मेंढपाळाच्या वाड्यावर ‘माजी मंत्र्यांचा’ मुक्काम एसी सोडून मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; महादेव जानकरांची ‘डाऊन टू अर्थ’ स्टाईल
: राजकारणाच्या झगमगाटापासून दूर, कडाक्याच्या उन्हात आणि रानावनात आयुष्य व्यतीत करणाऱ्या मेंढपाळांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी, राज्याचे माजी पशुसंवर्धनमंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेवजी जानकर यांनी चक्क मेंढरांच्या वाड्यावर मुक्काम केला. माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू असताना, माण तालुक्यातील पांगरी येथे त्यांनी हा अनोखा अनुभव घेतला. थेट माळरानावर विसावारासपचे माण तालुका युवक अध्यक्ष तात्याराम दडस यांच्या शेतात मेंढरांचा वाडा आहे.
कोणत्याही विशेष सोयीसुविधांची अपेक्षा न ठेवता, जानकर साहेब थेट या वाड्यावर पोहोचले. मोकळ्या माळरानावर, मेंढपाळांसोबत जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्या रोजच्या संघर्षाची, ऊन-वारा-पाऊस झेलत जगणाऱ्या जीवनाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्वतः मेंढपाळांसारखेच तीन दगडाच्या चुलीवरच्या भाकरी खाऊन, तिथेच रात्रीचा मुक्काम केला. ५० वर्षांपूर्वीचे बालपण आठवले!या अनुभवाबद्दल बोलताना महादेव जानकर भावूक झाले होते. ते म्हणाले, “आज मेंढपाळांसोबत या माळरानावर मुक्काम करताना मला माझ्या ५० वर्षांपूर्वीच्या बालपणाची आठवण झाली. मी पुन्हा एकदा माझ्या त्या संघर्षमय जीवनाचा भाग झालो असे मला वाटते. मेंढपाळांचे कष्ट मी जवळून पाहिले आहेत,
म्हणूनच त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ओढ कायम असते.”मेंढपाळांसाठी ‘मसिहा’ ठरलेले मंत्रीमहादेव जानकर यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात मेंढपाळांसाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले होते. मेंढपाळांना विमा संरक्षण देणे, मेंढ्यांचा विमा उतरवणे आणि शेळी-मेंढीसाठी निवारा सुरू करणारे ते पहिलेच मंत्री ठरले. आजही साधनसामग्रीचा कोणताही बडेजाव न मिरवता, गेल्या ३५-४० वर्षांपासून ते आपला पक्ष आणि सामाजिक कार्य पुढे नेत आहेत,
अशी माहिती रासपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शरद दडस यांनी दिली.चर्चेचा विषय लखलखते दिवे ना झगमगाट; जानकरांची रात्र मेंढपाळांच्या सहवासात.एकीकडे राजकीय नेते मोठ्या हॉटेल्स आणि बंगल्यांमध्ये वास्तव्य करत असताना, जानकरानी मात्र जमिनीवर झोपून मेंढपाळांशी नाळ जोडल्याने संपूर्ण माढा मतदारसंघात आणि सोशल मीडियावर त्यांच्या या साधेपणाचे मोठे कौतुक होत आहे.


