• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी. आ गोपीचंद पडळकर

माणगंगा by माणगंगा
May 13, 2026
in Uncategorized
0
बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी. आ गोपीचंद पडळकर

बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी. आ गोपीचंद पडळकर

सांगली, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानचा 149 कोटी 75 लाख रूपये खर्चाचा पर्यटन विकास सुधारित बृहत आराखडा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला.

हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनास पाठवण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील श्री बिरोबा देवालय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे व पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या पर्यटन विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, वास्तु विशारद प्रमोद चौगुले, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे आदि उपस्थित होते.

बिरोबा देवालय आरेवाडी येथे पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी येतात. यात्रा काळात साधारणत: दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी 2 दिवस मुक्कामास असतात. पर्यटन विकास आराखड्याच्या कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला हा सुधारित आराखडा राज्य स्तरावर पाठवावा. तेथे या आराखड्यास मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा करू, असे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले,‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी डोर्मेटरी भक्त निवास, दुकानगाळे, जमीन सपाटीकरण व जमीन सुधारणा, सायकल, मोटर सायकल स्टँड / कार पार्किंग, इतर बांधकामे इत्यादी साठीचा शासनाकडून जस-जसे निधी प्राप्त होईल त्यानुसार सदरची कामे क्रमाने पूर्ण करण्यात येत आहेत.

श्री बिरोबा देवालय आरेवाडी येथील देवस्थान ठिकाणी सन 2010-11 ते सन 2017-18 या कालावधीत जवळपास 8 कोटी रकमेची कामे पूर्ण झाली आहेत. सन 2024-25 मध्ये ‘ब’ वर्ग तीर्थ क्षेत्र योजनेंतर्गत एकूण 3 कोटी 98 लाख रूपये रकमेची 2 कामे मंजूर असून निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या मंजूर रकमेची कामे वगळून सुधारित बृहत विकास आराखडा 149 कोटी 75 लाख रूपये रक्कमेचा प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला. या सुधारित बृहत विकास आराखड्यांतर्गत सुविधा इमारती (सामान्य सुविधा केंद्र, प्रशासकीय इमारती, डॉरमेटरी, दुकाने, फर्निचर काम इत्यादी), मुख्य मंदिर दुरूस्ती, आंतरिक जलपुरवठा प्रणाली, विद्युत काम आंतरिक व बाह्य, अग्निशमन प्रणाली, रस्ता बांधकाम, आरसीसी कंपाउंड वॉल, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाचे पाणी संकलन, भूमी विकास कामे व इतर अन्य कामांचा समावेश आहे. अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली

Views: 38
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माझंही मत..;संजय राऊत यांची बाष्कळ बडबड…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

महाराष्ट्राचे विभाजन: व्यवहार्य की अव्यवहार्य…? भाग ६ विभाजन भावनिक मुद्द्यांवर व्हावी की व्यावहारिक मुद्द्यांवर..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)